India VS England : धोनीच्या खेळीमुळे गावसकरांना आठवली आपली ''ती'' कासवछाप खेळी 

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केलेल्या संथ फलंदाजीमुळे महेंद्सिंग धोनीवर टीकेची झोड उठली होती. आता विक्रमादित्य सुनील गावसकर यांनीही धोनीच्या या खेळीवर कटाक्ष टाकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 02:06 PM2018-07-17T14:06:39+5:302018-07-17T14:07:08+5:30

whatsapp join usJoin us
India vs England: Gavaskar remembers his knocks | India VS England : धोनीच्या खेळीमुळे गावसकरांना आठवली आपली ''ती'' कासवछाप खेळी 

India VS England : धोनीच्या खेळीमुळे गावसकरांना आठवली आपली ''ती'' कासवछाप खेळी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन -  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केलेल्या संथ फलंदाजीमुळे महेंद्सिंग धोनीवर टीकेची झोड उठली होती. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना संघ अडचणीत आल्यावर धोनीने केलेल्या बचावात्मक खेळाची क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावरून खिल्ली उडवली होती. आता विक्रमादित्य सुनील गावसकर यांनीही धोनीच्या या खेळीवर कटाक्ष टाकला असून, लॉर्डवरील धोनीच्या अतिसंथ फलंदाजीमुळे आपल्याला 1975 च्या विश्वचषकातील आपली नाबाद 36 धावांची खेळी आठवल्याचे गावसकर यांनी म्हटले आहे. 

धोनीच्या खेळीचा बचाव करताना गावसकर म्हणाले, "जेव्हा तुम्ही अशक्यप्राय स्थितीत फसता, तुमच्याकडेम मर्यादित पर्याय असतात, अशावेळी डोक्यात नकारात्मकता वाढते. चांगला मारलेला फटकासुद्धा क्षेत्ररक्षकाकडे जातो. त्यामुळे दबाव अधिकच वाढतो. धोनीच्या लॉर्ड्सवरच्या खेळीने मला माझ्या कुप्रसिद्ध खेळीचीयी आठवण झाली. जी मी याच मैदानावर खेळली होती."

तंत्रशुद्ध आणि संयमी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या सुनील गावसकर यांना सुरुवातीच्या काळामध्ये एकदिवसीय क्रिकेटशी जुळवून घेणे फारसे जमले नव्हते. त्यातच 1975 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या लढतीत सुनील गावसकर यांनी सलामीला येत 174 चेंडूत नाबाद 36 धावांची खेळी केली होती. गावसकर यांच्या या खेळीवर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात तुकार खेळी म्हणून ओळखली जाते. या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून 202 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.   

 भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने 322 धावा कुटल्या होत्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या इतर फलंदाजांप्रमाणेच महेंद्रसिंग धोनीलाही अपेक्षित फलंदाजी करता आली नाही. गरज असतानाही त्याला मोठे फटके खेळता येत नव्हते. त्यामुळे त्याने बचावात्मक खेळ करण्यावर भर दिला.  अखेर 59 चेंडूत 37 धावा करून तो बाद झाला. तसेच या लढतीत भारतीय संघाला 86 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.  
 

Web Title: India vs England: Gavaskar remembers his knocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.