India vs England 3rd Test: विराटने दिला होता अनुष्काला फ्लाइंग किस

शतक झळकावल्यावर कोहलीने खास सेलिब्रेशन केले. कोहलीने यावेळी आपली पत्नी अनुष्का शर्माला फ्लाइंग किस देत शतकाचे सेलिब्रेशन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 07:11 PM2018-08-21T19:11:36+5:302018-08-21T19:12:14+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 3rd Test: Virat Kohli had given flying kissing Anushka sharma | India vs England 3rd Test: विराटने दिला होता अनुष्काला फ्लाइंग किस

India vs England 3rd Test: विराटने दिला होता अनुष्काला फ्लाइंग किस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे92व्या षटकात कोहलीने चौकार लगावत कारकिर्दीतले 23वे शतक साजरे केले.

नॉटींगहम : भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. हे शतक झळकावल्यावर कोहलीने खास सेलिब्रेशन केले. कोहलीने यावेळी आपली पत्नी अनुष्का शर्माला फ्लाइंग किस देत शतकाचे सेलिब्रेशन केले.

92व्या षटकात कोहलीने चौकार लगावत कारकिर्दीतले 23वे शतक साजरे केले. कोहलीचे या दौऱ्यातील हे दुसरे शतक ठरले. यापूर्वी कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. कोहलीने 191 चेंडूंत दहा चौकारांनिशी यावेळी शतकाला गवसणी घातली. शतक झळकावल्यावर कोहलीला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने कोहलीला पायचीत पकडत तंबूचा रस्ता दाखवला. कोहलीने 197 चेंडूंमध्ये 10 चौकारांच्या मदतीने 103 धावांची खेळी साकारली.

Web Title: India vs England 3rd Test: Virat Kohli had given flying kissing Anushka sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.