India vs England 3rd ODI : इंग्लंडचा शानदार विजय, मालिकेवर यजमानांचा 2-1 असा कब्जा

अखेरच्या षटकांत शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर भारताने इंग्लंडपुढे 257 धावांचे आव्हान ठेवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 04:45 PM2018-07-17T16:45:12+5:302018-07-18T06:53:04+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 3rd one day LIVE: India's first batting, three changes in the team | India vs England 3rd ODI : इंग्लंडचा शानदार विजय, मालिकेवर यजमानांचा 2-1 असा कब्जा

India vs England 3rd ODI : इंग्लंडचा शानदार विजय, मालिकेवर यजमानांचा 2-1 असा कब्जा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लीड्स : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर जो रुट (१००*) आणि कर्णधार इयॉन मॉर्गर (८८*) यांच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने निर्णायक तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा ८ गड्यांनी धुव्वा उडवला. या शानदार विजयासह इंग्लंडने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करणा-या भारताला ५० षटकाxत ८ बाद २५६ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडने ४४.३ षटकाxत २ बाद २६० धावा करत बाजी मारली.
हेडिंग्ले स्टेडियमवर भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. फलंदाजांनी निराशानजक कामगिरी केल्यानंतर इंग्लंडने एकहाती वर्चस्व राखताना आरामात बाजी मारत मालिकाही जिंकली. आक्रमक जेसन रॉयच्या जागी खेळत असलेल्या जेम्स विन्सने जॉनी बेयरस्टॉसह संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. फलंदाजीत आक्रमक फटकेबाजी केलेल्या शार्दुल ठाकूरने भारताला पहिले यश मिळवून देताना बेयरस्टॉला बाद केले. त्याने १३ चेंडूत ७ चौकारांसह ३० धावांचा तडाखा दिला. यानंतर काहीवेळात विन्सही धावबाद झाला. विन्सने २७ चेंडूत ५ चौकारांसह २७ धावा केल्या. यावेळी भारतीय गोलंदाज सामन्यात रंग भरणार असे दिसत होते.
परंतु, रुट आणि मॉर्गन यांनी तिस-या गड्यासाठी १८६ धावांची नाबाद भागीदारी करत भारताच्या हातून सामना काढून घेतला. रुटने १२० चेंडूत १० चौकारांसह नाबाद १०० धावा केल्या. मॉर्गननेही १०८ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह नाबाद ८८ धावा केल्या. या दोघांनी शांतपणे फलंदाजी करत भारतीयांना यश मिळू दिले नाही. भारतीय गोलंदाज या दोघांना रोखण्यात पुर्णपणे अपयशी ठरले. रुट - मॉर्गन यांनी कोणताही धोका न पत्करताना संयमी फलंदाजी करत भारतीयांना चुका करण्यास भाग पाडले. पहिल्या दोन सामन्यांत चमकलेले युझवेंद्र चहल व कुलदीप पवार ही फिरकी जोडी या सामन्यात काहीच छाप पाडू शकले नाही.
तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहलीच्या (७१) शानदार अर्धशतकी खेळीनंतरही भारताला समाधानकारक मजल मारता आली. आक्रमक फलंदाजी अशी ओळख असलेल्या भारतीयांना यजमानांनी चांगलेच जखडवून ठेवले. डेव्हिड विली आणि आदिल राशिद यांनी प्रत्येकी ३ बळी घेत भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. रोहित शर्मा - शिखर धवन यां सलामीवीरांकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा असताना दोघेही अडखळत होते. डेव्हिड विलीने रोहित शर्माला (२) स्वस्तात बाद करत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविला. यावेळी ५.४ षटकात भारताच्या केवळ १३ धावा झाल्या होत्या. यानंतर कर्णधार कोहली आणि धवन यांनी संघाला सावरले.
धवन चांगल्या लयीमध्ये होता. परंतु, १८व्या षटकात तो धावबाद झाला. कोहली - धवन यांनी ७१ धावांची भागीदारी केली. धवनने ४९ चेंडूत ७ चौकारांसह ४४ धावा काढल्या. दिनेश कार्तिक २२ चेंडूत ३ चौकारांसह २१ धावा करुन परतला. दरम्यान कोहलीने एक बाजू लावून धरल्याने इंग्लंडचे गोलंदाज दबावाखाली होते.
राशिदने इंग्लंडला सर्वात मोठे यश मिळवून देताना कोहलीला त्रिफळाचीत केले. त्याने ७२ चेंडूत ८ चौकारांसह ७१ धावा फटकावल्या. यानंतर भारतीय संघाची धावगती कमालीची खालावली. पुन्हा एकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून संथ खेळी झाली. त्याला ६६ चेंडूत ४ चौकारांसह ४२ धावा काढता आल्या. सुरेश रैना केवळ एक धाव काढून तंबूत परतला.
याशिवाय हार्दिक पांड्या (२१), भुवनेश्वर कुमार (२१) यांनी चांगली फलंदाजी केली. तळाच्या शार्दुल ठाकूरने १३ चेंडूत २ शानदार षटकार ठोकत नाबाद २२ धावा केल्याने भारताला अडीचशेचा पल्ला पार करण्यात यश आले.
शिखर धवन - विराट कोहली बाद झाल्यानंतर इतर प्रमुख फलंदाजांकडून अपेक्षित फलंदाजी झाली नाही. विली आणि आदिल रशिद यांनी टिच्चून मारा करत भारतीयांना जखडवून ठेवले. विलीने ४० चेंडूत ३, तर राशिदने ४९ चेंडूत ३ बळी घेतले. मार्क वूड यानेही एक बळी घेत चांगला मारा केला. त्याने २ निर्धाव षटके टाकताना भारतीयांना सुरुवातीपासून दबावाखाली आणले. 

live updates : 

जो रुटचे दमदार अर्धशतक, 60 चेंडूत झळकावले अर्धशतक

24 षटकानंतर इंग्लंडच्या दोन बाद  143 धावा. विजयासाठी 156चेंडूत 114 धावांची गरज 

  • 20 षटकानंतर इंग्लंड मजबूत स्थितीत, केल्या दोन बाद  121 धावा
  • 15 षटकानंतर इंग्लंडने दोन बाद 103 धावा केल्या आहेत. रुट 31 तर मॉर्गन 10 धावांवर खेळत आहेत.  
  • दहा षटकानंतर इंग्लंडच्या दोन बाद 78 धावा
  • भारताला दुसरे यश, विन्स 27 धावांवर बाद
  • भारतीय गोलंदाजांची दाणादाण

इंग्लंडच्या फलंदाजांनी चिवट फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडवली आहे. 9 षटकानंतर इंग्लडच्या एक बाद 74 धावा

  • इंग्लंडला पहिला धक्का

पाचव्या षटकांत इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे. शार्दुल ठाकुरने जोनी बायर्स्तोव 30(12)ला सुरेश रैनाकरवी झेलबाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. 

  • इंग्लंडची सावध सुरुवात

भारताने दिलेल्या 257 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सावध सुरुवात केली आहे. चार षटकानंतर इंग्लंडने बिनबाद 38 धावा केल्या आहेत.  जेम्स विन्स 8(12), जोनी बायर्स्तोव 30(12) धावांवर खेळत आहेत. इंग्लंडला विजयासाठी 276 चेंडूत 219 धावांची गरज.

  • विराटसेनेची 256 धावांपर्यंत मजल

अखेरच्या षटकांत शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर भारताने इंग्लंडपुढे 257 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताने निर्धारित 50 षटकांत आठ बाद 256 धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, धोनी, रैना आणि धवन यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. रोहित शर्मा अवघ्या दोन धावांवर तंबूत परतला. त्यानंतर शिखर-विराटने संघाची धावसंख्या वाढवण्याचा पर्यत्न केला पण जम बसेलला शिखर धवन 44 धावांवर  धावबाद झाला. त्यानंतर आलेल्या कार्तिकने पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा घेतला. चांगल्या सुरुवातीनंतर कार्तिकही तंबूत परतला. 21 धावा काढून कार्तिक बाद झाला. धोनीने पुन्हा एकदा संथ फलंदाजी केली. धोनीने 66 चेंडूत 42 धावांची खेळी केली. रैना एका धाव काढून बाद झाला. हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. हार्दिक पांड्या 21 चेंडूत 21 धावा काढून बाद झाला.  आघाडीचे सर्वच फलंदाज बाद झाल्यानंतर भुवनेश्वर-शार्दुल जोडीने फटकेबाजी करत संघाची धावसंख्या 250 पार केली. भुवनेश्वर कुमारने नाबाद 21 धावांची खेळी केली तर शार्दुल ठाकूरने 13 चेंडूत 22 धावा चोपल्या. इंग्लंडकडून रशीद आणि विली प्रत्येकी तीन बळी घेतले.

  • स्टोक्सला धुतले - 

शार्दुलने 49 व्या षटकांत 17 धावा चोपल्या. स्टोक्सच्या या षटकांत शार्दुलने दोन षटकार लगावत भारताची धावसंख्या 250 पार नेहली

  • भुवनेश्वरची फटकेबाजी
  • अखेरच्या षटकांमध्ये शार्दुल ठाकूरला सोबत घेऊन भुवनेश्वर कुमारने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. 48 षटकानंतर भारताच्या सात बाद 234 धावा. भुवनेश्वर कुमार 19 धावांवर खेळत आहे. 
  • धोनी बाद - 

संथ गतीने खेळणारा धोनी बाद झाला. धोनीने 66 चंडूत 42 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने चार चौकार लगावले. सध्या भुवनेश्वर कुमार 10 धावांवर खेळत आहे.  46 षटकानंतर भारताच्या सात बाद 222 धावा. 

  • इंग्लंडची टिच्चून गोलंदाजी, धोनी-भुवनेश्वर मैदानावर
  • हार्दिक पांड्या बाद
  • सुरेश रैना OUT

कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर लगेच सुरेश रैनाही तंबूत परतला.  आदिल रशीदने रैनाला एका धावावर बाद केले

  • भारताला मोठा धक्का, कर्णधार विराट कोहली OUT

भारतीय कर्णधार विराट कोहली अदिल रशीदच्या गोलंदाजीवर क्लिनबोल्ड झाला. विराट कोहलीने  72 चेंडूत 71 धावांची दमदार खेळी करत भारतीय संघाच्या धावसंखेला आकार दिला. विराटने 8 चौकार लगावत 71 धावांची खेळी केली. 30.1 षटकानंतर भारताच्या चार बाद 156 धावा झाल्या आहेत. मैदानावर धोेनी आणि रैना आहेत.

  • 25 षटकांत भारताच्या तीन बाद 129 धावा, विराट कोहली 55 आणि धोनी 3 धावांवर खेळत आहेत.
  •  विराटची एकाकी झुंज, भारतीय फलंदाजांची हाराकिरी सुरूच

भरातीय कर्णधार विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांची चांगली जोडी जमली होती. पण रशीदच्या गोलंदाजीवर स्वीप शॉट खेळताना कार्तिक बोल्ड झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. कार्तिकने 22 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. एका बाजूने विकेट पडत असताना कर्णधार विराट कोहलीची दमदार फंलदाजी सुरु आहे. कोहलीने सहा चौकारसह आपले अर्धशतक पुर्ण केले. सध्या आजी-माजी कर्णधार मैदानावर आहेत. 

  • भारताला दुसरा धक्का, दिनेश कार्तिक मैदानावर

85 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला आहे. शिखर धवन 49 चेंडूत 44 धावा काढून धावबाद झाला. विराट कोहली 
 35(39) आणि दिनेश कार्तिक 4 खेळत आहेत. 

  • शिखर धवन आणि विराट कोहली तडाखेबाज फलंदाजी, 14 षटकानंतर भारत एक बाद 60 धावा 
  • इंग्लंडची भेदक गोलंदाजी, विराट-शिखर मैदानावर

इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्यावर गोलंदाजी करत भारताच्या फलंदाजीस बांधून ठेवले आहे. दहा षटकानंतर भारताने एका गड्याच्या मोबदल्यात 32 धावा केल्या आहेत. विराट कोहली 15(17) आणि शिखर धवन 15(25) खेळत आहे. विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून खेळताना 3 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 

  • विराट कोहलीने चौकार मारत केली धमाकेदार सुरुवात
  • भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद 

संथ सुरुवातीनंतर सलामीवीर रोहित शर्मा दोन धावांवर बाद झाला. वेलीने टाकेलेला चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात स्क्वॉयर लेग उभा असलेल्या मार्क वुडकडे सोप्पा झेल देऊन बाद झाला. 

  • शिखर-रोहितची सावध सुरुवात

सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात  केली आहे. पहिल्या पाच षटकानंतर भारताने बिनबाद 12 धावा केल्या आहेत.  रोहित शर्मा 2(16), शिखर धवन 10(14)  खेळत आहेत. 


असे आहेत दोन्ही संघ

भारत



 

इंग्लंड



धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. वूड गो. विली २, शिखर धवन धावबाद (स्टोक्स) ४४, विराट कोहली त्रि. गो. आदिल राशिद ७१, दिनेश कार्तिक त्रि. गो. राशिद २१, महेंद्रसिंग धोनी झे. बटलर गो. विली ४२, सुरेश रैना झे. रुट गो. राशिद १, हार्दिक पांड्या झे. बटलर गो. वूड २१, भुवनेश्वर कुमार झे. बेयरस्टॉ गो. विली २१, शार्दुल ठाकुर नाबाद २२. अवांतर: ११. एकूण : ५० षटकात ८ बाद २५६ धावा. गोलंदाजी : मार्क वूड १०-२-३०-१; डेव्हिड विली ९-०-४०-३; लियाम प्लंकेट ५-०-४१-०; मोइन अली १०-०-४७-०; बेन स्टोक्स ६-०-४३-०; आदिल राशिद १०-०-४९-३.
इंग्लंड : जेम्स विन्स धावबाद (हार्दिक - धोनी) २७, जॉनी बेयरस्टॉ झे. रैना गो. ठाकूर ३०, जो रुट नाबाद १००, इयॉन मॉर्गन नाबाद ८८; अवांतर - १५. एकूण : ४४.३ षटकात २ बाद २६० धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ७-०-४९-०; हार्दिक पांड्या ५.३-०-३९-०; शार्दुल ठाकूर १०-०-५१-१; युझवेंद्र चहल १०-०-४१-०; कुलदीप यादव १०-०-५५-०; सुरेश रैना २-०-१६-०.

Web Title: India vs England 3rd one day LIVE: India's first batting, three changes in the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.