India vs Australia : रोहित शर्माला पाचव्या सामन्यात तेंडुलकर व धोनीचा 'हा' खास विक्रम मोडण्याची संधी

India vs Australia : मोहाली वन डे सामन्याच्या निकालानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिका 2-2 अशी बरोबरीत आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:01 PM2019-03-12T16:01:04+5:302019-03-12T16:01:44+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia : Rohit Sharma stands 46 runs away from equalling Sourav Ganguly's ELITE record | India vs Australia : रोहित शर्माला पाचव्या सामन्यात तेंडुलकर व धोनीचा 'हा' खास विक्रम मोडण्याची संधी

India vs Australia : रोहित शर्माला पाचव्या सामन्यात तेंडुलकर व धोनीचा 'हा' खास विक्रम मोडण्याची संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मोहाली वन डे सामन्याच्या निकालानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिका 2-2 अशी बरोबरीत आली आहे. त्यामुळे बुधवारी नवी दिल्ली येथील फिरोज शाह कोटला मैदानावर होणाऱ्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. मालिका विजयाच्या दृष्टीनं आणि वर्ल्ड कप स्पर्धेत सकारात्मक दृष्टिकोनानं दाखल होण्यासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. हा सामना उपकर्णधार रोहित शर्मासाठीही खास ठरणार आहे. या सामन्यात हिटमॅनला महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडण्याची आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचीही संधी आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात 46 धावा केल्यास वन डे क्रिकेटमध्ये रोहित 8000 धावांचा पल्ला गाठणार आहे. या कामगिरीसह सर्वात जलद 8000 धावा करण्याच्या गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी तो बरोबरी करणार आहे. गांगुलीनं 200 डावांत 8000 धावा केल्या होत्या. रोहितनं 199 डावांत 7954 धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8 हजार धावांचा विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 175 डावांत हा पराक्रम केला आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स ( 182 डाव) आणि गांगुलीचा क्रमांक येतो. 

सर्वात जलद 8000 धावा करणारे खेळाडू 
विराट कोहली ( भारत) 175 डाव
एबी डिव्हिलियर्स ( द. आफ्रिका) 182 डाव
सौरव गांगुली ( भारत) 200 डाव
रॉस टेलर ( न्यूझीलंड) 203 डाव
सचिन तेंडुलकर ( भारत) 210 डाव
ब्रायन लारा ( वेस्ट इंडिज) 211 डाव 
महेंद्रसिंग धोनी ( भारत ) 210 डाव
सईद अन्वर ( पाकिस्तान) 218 डाव

रोहित शर्मानं या मालिकेतील चौथ्या सामन्यात 95 धावांची खेळी केली होती. त्यात 7 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. मात्र, अन्य तीन सामन्यांत त्याला केवळ 14, 0 आणि 37 धावा करता आल्या आहेत. 

Web Title: India vs Australia : Rohit Sharma stands 46 runs away from equalling Sourav Ganguly's ELITE record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.