IND vs AUS 4th Test : 'करो या मरो' सामन्यात ऑस्ट्रेलिया दोन प्रमुख खेळाडूंना बाकावर बसवणार?

IND vs AUS 4th Test : कसोटी मालिकेतील मानहानिकारक पराभव टाळण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 11:45 AM2019-01-02T11:45:24+5:302019-01-02T11:46:13+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia 4th Test : Finch, Marsh out of SCG Test: Reports | IND vs AUS 4th Test : 'करो या मरो' सामन्यात ऑस्ट्रेलिया दोन प्रमुख खेळाडूंना बाकावर बसवणार?

IND vs AUS 4th Test : 'करो या मरो' सामन्यात ऑस्ट्रेलिया दोन प्रमुख खेळाडूंना बाकावर बसवणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया चौथा सामना गुरुवारपासून सिडनीत भारतीय संघाने 13 सदस्यीय संघ जाहीर केलाऑस्ट्रेलियाचा संघ खेळपट्टीच्या पाहाणीनंतर

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कसोटी मालिकेतील मानहानिकारक पराभव टाळण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ सज्ज झाला आहे. भारतीय संघ या मालिकेत 2-1 अशा आघाडीवर आहे आणि सिडनीत होणाऱ्या चौथ्या सामन्यात त्यांना अनिर्णीत निकालही पुरसा आहे. पण, यजमान ऑस्ट्रेलियासाठी चौथा सामना करो या मरो असाच आहे आणि त्यासाठी या सामन्यात त्यांच्याकडून विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणार आहेत. या सामन्यासाठी भारतीय संघाने 13 सदस्यीस संघ जाहीर केला आहे, परंतु ऑसी आणखी 'वेट अॅण्ड वॉच'च्या भुमिकेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया या सामन्यासाठी दोन प्रमुख, परंतु सातत्याने अपयशी ठरलेल्या खेळाडूंना बाकावर बसविण्याच्या तयारीत आहेत.

सलामीवर अॅरोन फिंचला या मालिकेत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. संघातील सर्वात अनुभवी फलंदाज असलेल्या फिंचला तीन सामन्यांत केवळ 97 धावा करता आल्या आहेत. त्यात केवळ एकच अर्धशतकाचा समावेश आहे. त्यामुळे त्याला फिंचला डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिचल मार्शला हा डच्चू मिळणारा दुसरा खेळाडू ठरू शकेल. फिंचच्या जागी संघात मार्नस लॅबसचॅग्नेला, तर मार्शच्या जागी पीटर हॅण्ड्सकोम्बला संधी मिळू शकेल. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून याबाबद अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर कर्णधार टीम पेन अंतिम निर्णय घेईल. 



ऑस्ट्रेलियाला मेलबर्न कसोटीत 137 धावांनी पराभूत करून भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. 41 वर्षांत प्रथमच भारताने ऑस्ट्रेलियात दोन कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला आणि 71 वर्षांच्या इतिहासात भारताला ऑस्ट्रेलियात प्रथमच मालिका विजयाची संधी आहे. त्यामुळे भारतीय संघानेही कंबर कसली आहे. भारताने जाहीर केलेल्या 13 सदस्यीय संघात तीन फिरकीपटूंना संधी दिली आहे. आर अश्विनच्या दुखापतीची चिंता असली तरी भारतीय संघाने दोन फिरकीपटूंसह सिडनीत उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

Web Title: India vs Australia 4th Test : Finch, Marsh out of SCG Test: Reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.