India Vs Afghanistan Latest News :मोहम्मद शमीने रचला इतिहास, वर्ल्डकपमध्ये हॅटट्रिक करणारा ठरला दुसरा भारतीय 

डावातील शेवटच्या षटकात मोहम्मद शमीने रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 11:26 PM2019-06-22T23:26:37+5:302019-06-22T23:32:57+5:30

whatsapp join usJoin us
India vs Afghanistan Latest News: Mohammed Shami made history, hat-trick in World Cup | India Vs Afghanistan Latest News :मोहम्मद शमीने रचला इतिहास, वर्ल्डकपमध्ये हॅटट्रिक करणारा ठरला दुसरा भारतीय 

India Vs Afghanistan Latest News :मोहम्मद शमीने रचला इतिहास, वर्ल्डकपमध्ये हॅटट्रिक करणारा ठरला दुसरा भारतीय 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

साऊदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. अफगाणिस्तान : विश्वचषकामध्ये आज अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भारताने अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात केली. या लढतीत मोहम्मद शमीने भेदक मारा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यादरम्यान, डावातील शेवटच्या षटकात अफगाणिस्तानला विजयासाठी 16 धावांची गरज असताना शमीने शेवटच्या तीन फलंदाजांना तंबूची वाट दाखवत हॅट्ट्रिक नोंदवली. त्याने आपल्या शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे मोहम्मद नबी, अफताब आलम आणि मुजीब उर रहमान यांना त्रिफळाबाद केले.


क्रिकेट विश्वचषकामध्ये हॅटट्रिक नोंदवणारा शमी हा एकूण दहावा आणि भारताचा दुसरा गोलंदाज ठरला. याआधी चेतन शर्मा यांनी 1987 च्या विश्वचषकात हॅटट्रिक नोंदवली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून याआधी चेतन शर्मा, कपिल देव आणि कुलदीप यादव यांची हॅटट्रिक नोंदवली आहे. 

विश्वचषषकात आतापर्यंत  नोंदवल्या गेलेल्या हॅटट्रिक

विश्वचषकातील हॅटट्रीक
१९८७- चेतन शर्मा
१९९९- साकलेन मुश्ताक
२००३- चमिंडा वास
२००३- ब्रेट ली
२००७- लसिथ मलिंगा
(चार चेंडूत चार बळी)
२०११- केमार रोच
२०११- लसिथ मलिंगा
२०१५- स्टीव्हन फिन
२०१५- जे.पी.डुमिनी
२०१९- मोहम्मद शमी

 भारतासारख्या दिग्गज संघाला अफगाणिस्तानसारख्या अनुनभवी संघांचे चांगलेच झुंजवले. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना चांगलाच रंगला.
अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत किल्ला लढवला खरा, पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. भारताने अफगाणिस्तानपुढे २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग अफगाणिस्तानला करता आला नाही.

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या सलामीवीरांना झटपट माघारी पाठवून अफगाणिस्तानने टीम इंडियाला कोंडीत पकडले. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करून संघाला या गुंत्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतकाचे शतकात रुपांतर करता आले नाही. विजय शंकरला आज मोठी खेळी करून आपले स्थान पक्कं करण्याची संधी होती, परंतु तोही अपयशी ठरला. महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी विकेट टिकवली, परंतु त्यांच्या धावांच्या गतीचा वेग संथ होता. त्यामुळे भारताला २२४ धावांपर्यंतच मजल मारता आली. 

Web Title: India vs Afghanistan Latest News: Mohammed Shami made history, hat-trick in World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.