रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा, भारताचा पुढचा दौरा विराटविना!

India tour of Windies: भारतीय संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास उपांत्य फेरीत संपुष्टात आला. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर झालेल्या लढतीत न्यूझीलंडनं 18 धावांनी भारतावर विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 06:47 PM2019-07-12T18:47:36+5:302019-07-12T18:51:12+5:30

whatsapp join usJoin us
India tour of Windies: Rohit Sharma to lead Men In Blue in Virat Kohli's absence; Ajinkya Rahane to captain Test side  | रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा, भारताचा पुढचा दौरा विराटविना!

रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा, भारताचा पुढचा दौरा विराटविना!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतीय संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास उपांत्य फेरीत संपुष्टात आला. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर झालेल्या लढतीत न्यूझीलंडनं 18 धावांनी भारतावर विजय मिळवला. पण, तिकिटांचे बुकींग न झाल्यामुळे भारतीय खेळाडूंना 14 जुलैच्या आधी लंडन सोडता येणार नाही. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या स्पर्धेत कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली जाऊ शकते. विराटच्या अनुपस्थितीत वन डे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे, तर कसोटी संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

इंग्लंडच्या खेळाडूनं उडवली विराट कोहलीची खिल्ली; म्हणाला...

भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर दोन कसोटी व प्रत्येकी तीन वन डे व ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 3 ते 8 ऑगस्ट या कालावधीत ट्वेंटी-20 मालिका होईल. त्यापाठोपाठ 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन वन डे आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येतील. वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर  मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कोहली आणि निवड समिती प्रमुख एमएसके  प्रसाद यांना बीसीसीआयच्या प्रशासकिय समितीला काही उत्तरं द्यावी लागणार आहेत.
इंडियन एस्क्प्रेसनं दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंवरील ताण लक्षात घेता कोहली व बुमराह यांना आगामी विंडीज दौऱ्यातून विश्रांती देणार असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून हे दोघंही सातत्यानं खेळत आहेत. कसोटी मालिकेपूर्वी ते संघात सहभागी होतील असेही सांगण्यात येत आहे.

धोनीला चौथ्या क्रमांकावर न पाठवण्यामागे होतं हे कारण, शास्त्रींचा खुलासा

उपांत्य फेरीतील पराभवानंतर संजय बांगरची 'विकेट'? शास्त्री गुरुजींना 'एक्स्टेन्शन'
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतरही मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि साहाय्यक स्टाफच्या करारात 45 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पण, साहाय्यक प्रशिक्षक आणि फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. बांगर यांना अधिक चांगला रिझल्ट देता आला असता असे मत भारतीय क्रिकेट मंडळानं ( बीसीसीआय) व्यक्त केले.

वर्ल्ड कप स्पर्धा आता आयपीएल फॉरमॅटमध्ये खेळवा, विराट कोहलीचा पर्याय


गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून दाखवली, तर क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांनीही त्यांची भूमिका चोख पार पाडली. पण, बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजांची कामगिरी चांगली झालेली नाही. बांगर यांना चौथ्या क्रमांकाचा पर्याय शोधताच आला नाही आणि त्यामुळेच भारताचे आव्हान संपुष्टात आले. IANS सोबत बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले की,''फलंदाजांची चुकलेली निवड यामुळे आम्हाला फटका बसला. बांगर यांना योग्य पर्याय निवडता आला नाही. खेळाडूंना आम्ही सर्वतोपरी सहकार्य केले आणि त्यांनीही चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना वगळता.''  

भारतीय संघ वर्ल्ड कपनंतर 15 दिवसांत विंडीज दौऱ्यावर, टेस्ट चॅम्पियन्सशीपचा श्रीगणेशा

Web Title: India tour of Windies: Rohit Sharma to lead Men In Blue in Virat Kohli's absence; Ajinkya Rahane to captain Test side 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.