भारताचा विजय सात बळींनी दूर, श्रीलंकेचा दुसरा डाव ३ बाद ३१ असा गडगडला

आघाडीच्या तीन फलंदाजांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर रवींद्र जडेजाच्या दोन बळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध तिस-या व अखेरच्या कसोटी क्रिकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:01 AM2017-12-06T03:01:09+5:302017-12-06T03:02:55+5:30

whatsapp join usJoin us
India lost seven wickets, Sri Lanka's second innings fell 31 runs from three games | भारताचा विजय सात बळींनी दूर, श्रीलंकेचा दुसरा डाव ३ बाद ३१ असा गडगडला

भारताचा विजय सात बळींनी दूर, श्रीलंकेचा दुसरा डाव ३ बाद ३१ असा गडगडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आघाडीच्या तीन फलंदाजांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर रवींद्र जडेजाच्या दोन बळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध तिस-या व अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात मंगळवारी चौथ्या दिवशी विजयाच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले.
भारताने श्रीलंकेपुढे विक्रमी ४१० धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाची चौथ्या दिवसअखेर ३ बाद ३१ अशी अवस्था झाली आहे. अंधूक प्रकाशामुळे फिरोजशाह कोटलावर चौथ्या दिवसाचा खेळ निर्धारित १३ षटकांपूर्वी थांबविण्यात आला. त्यावेळी १३ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या धनंजय डिसिल्वा याला अँजेलो मॅथ्यूज (०) खाते न उघडता साथ देत होता. श्रीलंकेने दुसºया डावात सलामीवीर सदीरा समरविक्रम (५) व दिमुथ करुणारत्ने (१३) यांच्या व्यतिरिक्त नाईटवॉचमन सुरंगा लकमल (००) यांच्या विकेट गमावल्या. समरविक्रमला मोहम्मद शमीने (१-८)स्लिपमध्ये तैनात अजिंक्य रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडले तर करुणारत्ने जडेजाच्या (२-५) गोलंदाजीवर यष्टिरक्षक सहाकडे झेल देत माघारी परतला. जडेजाने त्यानंतर लकमलचा त्रिफळा उडवला. श्रीलंका संघाला विजयासाठी अद्याप ३७९ धावांची गरज आहे तर भारत विजयापासून ७ विकेट दूर आहे.
पहिल्या डावात १६३ धावांची आघाडी घेणाºया भारताने ३२ वा वाढदिवस साजरा करणारा सलामीवीर शिखर धवन (६७), कर्णधार विराट कोहली (५०), रोहित शर्मा (नाबाद ५०) आणि चेतेश्वर पुजारा (४९) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर दुसरा डाव ५ बाद २४६ धावांवर घोषित केला.
फिरोजशाह कोटलावर कुठल्याही संघाला चौथ्या डावात ३६४ पेक्षा अधिक धावा फटकावता आलेल्या नाहीत. भारताने डिसेंबर १९७९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ६ बाद ३६४ धावा करत सामना अनिर्णीत राहिला होता.
या मैदानावर सर्वांत मोठे लक्ष्य गाठण्याचा विक्रम भारत आणि वेस्ट इंडिज संघाच्या नावावर आहे. त्यांनी एकमेकांविरुद्ध २७६ धावांचे लक्ष्य गाठताना पाच बाद २७६ धावा केल्या होत्या आणि पाच गडी राखून विजय मिळवला होता. विंडीजने नोव्हेंबर १९८७ मध्ये तर भारताने नोव्हेंबर २०११ मध्ये अशी कामगिरी केली होती.
सकाळच्या सत्रात श्रीलंकेचा पहिला डाव ३७३ धावांत संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात १६३ धावांची आघाडी घेतली. श्रीलंकेतर्फे कर्णधार दिनेश चांदीमलने कारकिर्दीतील सर्वोत्तम १६४ धावांची खेळी केली तर सोमवारी अँजेलो मॅथ्यूजने १११ धावा फटकावल्या होत्या. भारतीय संघाकडून रविचंद्रन आश्विन (३-९०) व ईशांत शर्मा (३-९८) यांनी प्रत्येकी तीन, तर मोहम्मद शमी (२-८५) व रवींद्र जडेजा (२-८६) यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

धावफलक
भारत (पहिला डाव) : ७ बाद ५३६ (डाव घोषित).
श्रीलंका (पहिला डाव) : १३५.३ षटकांत सर्वबाद ३७३.
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय झे. डिकवेला गो. लकमल ०९, शिखर धवन यष्टिचित डिकवेला गो. संदाकन ६७, अजिंक्य रहाणे झे. संदाकन गो. परेरा १०, चेतेश्वर पुजारा झे. मॅथ्यूज गो. डिसिल्वा ४९, विराट कोहली झे. लकमल गो. गमागे ५०, रोहित शर्मा नाबाद ५०, रवींद्र जडेजा नाबाद ०४. अवांतर (०७). एकूण ५२.२ षटकांत ५ बाद २४६. बाद क्रम : १-१०, २-२९, ३-१०६, ४-१४४, ५-२३४. गोलंदाजी : लकमल १५-३-६०-१, गमागे १२.२-१-४८-१, परेरा १०-०-५४-१, डिसिल्वा ५-०-३१-१, संदाकन १०-०-५०-१.
श्रीलंका (दुसरा डाव) : दिमुथ करुणारत्ने झे. साहा गो. जडेजा १३, सदीरा समरविक्रम झे. रहाणे गो. शमी ०५, धनंजय डिसिल्वा खेळत आहे १३, सुरंगा लकमल त्रि. गो. जडेजा ००, अँजेलो मॅथ्यूज खेळत आहे ००. अवांतर (०). एकूण १६ षटकांत ३ बाद ३१. बाद क्रम : -१-१४, २-३१, ३-३१. गोलंदाजी : ३-०-६-०, शमी ३-१-८-१, अश्विन ५-२-१२-०, जडेजा ५-२-५-२.
 

Web Title: India lost seven wickets, Sri Lanka's second innings fell 31 runs from three games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.