भारताने गमावली विजयाची संधी, आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलामी लढत १-१ ने बरोबरीत

भारतीय पुरुष हॉकी संघाने विश्व हॉकी लीगच्या अंतिम फेरीत सलामीला विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाला पराभूत करण्याची संधी शुक्रवारी गमावली. अत्यंत तडफदार खेळ केल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी संधी घालविल्यामुळे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:31 AM2017-12-02T01:31:14+5:302017-12-02T01:33:28+5:30

whatsapp join usJoin us
 India have a chance to win, 1-1 in the opening match against Australia | भारताने गमावली विजयाची संधी, आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलामी लढत १-१ ने बरोबरीत

भारताने गमावली विजयाची संधी, आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलामी लढत १-१ ने बरोबरीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भुवनेश्वर : भारतीय पुरुष हॉकी संघाने विश्व हॉकी लीगच्या अंतिम फेरीत सलामीला विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाला पराभूत करण्याची संधी शुक्रवारी गमावली. अत्यंत तडफदार खेळ केल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी संधी घालविल्यामुळे विजयाने हुलकावणी दिली. हा सामना १-१ ने बरोबरीत सुटला.
कलिंगा स्टेडियमवर विद्युत प्रकाशझोतात घरच्या प्रेक्षकांपुढे रंगलेला हा सामना अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण ठरला. भारताने या सामन्यावर बराचवेळ वर्चस्व गाजविले. चेंडू अधिकाधिक वेळ ताब्यात ठेवला. पण गोल नोंदविण्याची वेळ येताच चुका केल्यामुळे पाहुण्या संघावर आघाडी घेता आली नाही. सामन्यात २० व्या मिनिटाला भारताने पहिला गोल करीत आघाडी मिळविली. ड्रॅगफ्लिकर मनदीपसिंग याने हा गोल केला. तथापि भारतीय खेळाडूंना आनंद साजरा करण्याची वेळच मिळाली नाही. पुढच्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर जेरेमी हेवर्ड याने गोल करीत बरोबरी साधून दिली.
भारताच्या आक्रमक फळीने वारंवार हल्ले करीत आघाडी घेण्याचे प्रयत्न केले, तथापि आक्रमक फळीतील आकाशदीप आणि गुरजंत यांच्या चुका महागड्या ठरल्या. एस. व्ही. सुनीलने दिलेल्या पासवर चेंडू गोलजाळेत ढकलण्यात गुरजतला अपयश आले. सामना संपायला काही मिनिटे असताना भारताला मिळालेला पेनल्टी कॉर्नर व्यर्थ जाताच चाहत्यांची घोर निराशा झाली. भारताला आज शनिवारी इंग्लंडविरुद्ध सामना खेळायचा आहे. (वृत्तसंस्था)

Web Title:  India have a chance to win, 1-1 in the opening match against Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.