भारत, इंग्लंड विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - व्हिव्हियन रिचर्डस्

जमान इंग्लंडसह भारत, पाकिस्तान आणि आॅस्ट्रेलिया हे संघ २०१९ च्या आयसीसी क्रिकेट विश्वकपमध्ये जेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे वेस्ट इंडिजचा महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्डस्ने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 05:40 AM2018-12-28T05:40:09+5:302018-12-28T05:45:16+5:30

whatsapp join usJoin us
 India, England's leading contenders - Vivian Richards | भारत, इंग्लंड विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - व्हिव्हियन रिचर्डस्

भारत, इंग्लंड विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - व्हिव्हियन रिचर्डस्

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गुवाहाटी : यजमान इंग्लंडसह भारत, पाकिस्तान आणि आॅस्ट्रेलिया हे संघ २०१९ च्या आयसीसी क्रिकेट विश्वकपमध्ये जेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे वेस्ट इंडिजचा महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्डस्ने म्हटले आहे. रिचर्डस् म्हणाले,‘इंग्लंड चांगला खेळत आहे, पण ते अखेरच्या क्षणी पिछाडीवर पडतात. त्यांचा संघ नेहमीच चांगला असतो. पाकिस्तान आणि भारत या संघांमध्ये कुठल्याही संघांना पराभूत करण्याची क्षमता आहे. आॅस्ट्रेलियाही शानदार संघ आहे. त्यामुळे माझ्या मते या चार-पाच संघांमध्ये २०१९ चा विश्वकप जिंकण्याची क्षमता आहे.’
विंडीज संघाबाबत विचारले असताना रिचर्डस् म्हणाले, ‘संघाला अलीकडच्या काळात सर्वोत्तम कमागिरी करता आली नाही, पण भविष्यात हा संघ अव्वल स्थानावर पोहचेल, अशी आशा आहे.’
पाकिस्तानचा दिग्गज इम्रान खानप्रमाणे राजकारणात पडण्याच्या शक्यतेबाबत बोलताना रिचर्डस् म्हणाले,‘माझ्यासाठी ही कठीण बाब आहे. लोकांचे समाधान करणे कठीण असते. कारण ते नेहमी अपेक्षेपेक्षा अधिकची आशा करतात. या पदावर पोहचणाऱ्या इम्रानची इर्षा वाटते.’

Web Title:  India, England's leading contenders - Vivian Richards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.