IND vs WIN 5th ODI: भारतीय संघात पाहायला मिळतील बदल, सलामीला नवा भिडू?

IND vs WIN 5th ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन डे मालिकेतील अखेरचा सामना ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 12:20 PM2018-11-01T12:20:09+5:302018-11-01T12:22:15+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WIN 5th ODI: KL Rahul will replace shikhar dhawan in fifth ODI | IND vs WIN 5th ODI: भारतीय संघात पाहायला मिळतील बदल, सलामीला नवा भिडू?

IND vs WIN 5th ODI: भारतीय संघात पाहायला मिळतील बदल, सलामीला नवा भिडू?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

त्रिवेंद्रम : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन डे मालिकेतील अखेरचा सामना ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या स्टेडियमवर भारताने गतवर्षी ट्वेंटी-20 सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला होता. आज होणऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या संघाने मुंबईत झालेल्या चौथ्या सामन्यात विंडीजवर 224 धावांनी विजय मिळवून 2-1 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे पाचव्या सामन्यात भारतीय संघ बदल करण्याची शक्यता फार कमी आहे, परंतु ती नाकारता येत नाही. 

कोहली आणि रोहित शर्मा हे चांगल्या फॉर्मात आहेत, सलामीवीर शिखर धवन यानेही तिसऱ्या सामन्यात 38 धावा केल्या होत्या. मात्र, पाचव्या सामन्यात बाकावर बसलेल्या लोकेश राहुलला रोहितसह सलामीला खेळण्याची संधी मिळू शकते. बुधवारी त्याने नेटमध्ये कसून सरावही केला. 
 



कोहली, अंबाती रायुडू, केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनी ही मधल्या फळीतील फौज प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये धडकी भरवण्यासाठी पुरेशी आहे. धोनी कामगिरीशी झगडत असला तरी त्याचे स्थान कायम आहे. भुवनेश्वर कुमारचा फॉर्म हा चिंतेचा विषय असला तरी त्याला वगळणार नाही. जस्प्रीत बुमरा आणि खलील अहमद हेही कायम राहतील. युजवेद्र चहलचे संघात पुनरागमन अवघड आहे. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी तिसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. 

असा असेल संघ : शिखर धवन किंवा लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जस्प्रीत बुमरा, खलील अहमद. 

Web Title: IND vs WIN 5th ODI: KL Rahul will replace shikhar dhawan in fifth ODI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.