IND Vs WIN 1st OneDay : चिंता नको, भारताचेच पारडे जड!

IND Vs WIN 1st OneDay : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 01:28 PM2018-10-21T13:28:29+5:302018-10-21T13:28:44+5:30

whatsapp join usJoin us
IND Vs WIN 1st One Day: Do not worry, records with India side | IND Vs WIN 1st OneDay : चिंता नको, भारताचेच पारडे जड!

IND Vs WIN 1st OneDay : चिंता नको, भारताचेच पारडे जड!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गुवाहाटी : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यातून रिषभ पंत वन डे संघात पदार्पण करणार आहे, तर वेस्ट इंडिजकडून ओशाने थॉमस आणि चंद्रपॉल हेमराज यांचे पदार्पण होणार आहे. 



विंडीजविरुद्ध भारत मायदेशात 50 वन डे सामने खेळला आहे. त्यात भारताने 24, तर विंडीजने 26 सामने जिंकले आहेत. परंतु, मागील 25 वर्षांत भारताने सर्वाधिक 22 विजय मिळवले आहेत. 


भारताने घरच्या मैदानावर खेळताना मागिल 11 वन डे मालिकेत 10 वेळा विजय  मिळवला आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून ( 2-3) पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे वेस्ट इंडिजला मागील 11 वन डे मालिकांमध्ये विजय मिळवता आलेला नाही. 
 


Web Title: IND Vs WIN 1st One Day: Do not worry, records with India side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.