IND vs WI T20: Two new faces in the third match in the Indian team? | IND vs WI T20: तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात दिसतील दोन नवीन चेहरे?
IND vs WI T20: तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात दिसतील दोन नवीन चेहरे?

ठळक मुद्देभारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा सामना रविवारीजस्प्रीत बुमरा, उमेश यादव व कुलदीप यादव यांना विश्रांतीप्रमुख खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता

चेन्नई : भारताने ट्वेंटी-20 मालिकेतही वेस्ट इंडिजला पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी चेन्नई येथे होणार आहे आणि हा सामना भारतासाठी केवळ औपचारिक राहणार आहे. त्यामुळे या सामन्यात प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन भारतीय संघात नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात जस्प्रीत बुमरा, उमेश यादव आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी तशी घोषणा केली. त्यांच्या जागी संघात सिद्धार्थ कौलचा समावेश करण्यात आला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पण, या लढतीत कौलला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

या दौऱ्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारत प्रथम ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे आणि 21 नोव्हेंबरला होणाऱ्या या सामन्याची पूर्वतयारी म्हणून रविवारच्या लढतीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळू शकते. लोकेश राहुल, शिखर धवन आणि रिषभ पंत यांना फॉर्म परत मिळवण्याची ही अखेरची संधी असणार आहे.


Web Title: IND vs WI T20: Two new faces in the third match in the Indian team?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.