IND vs WI : 'विराटसेल्फी' पडणार महागात; तुरुंगाची हवा खावी लागणार...

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीला भेटण्याची आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढण्याची इच्छा पूर्ण केली. पण ही इच्छा आता त्याला चांगलीच महागात पडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 03:35 PM2018-10-13T15:35:20+5:302018-10-13T15:35:47+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI: cricket case filed against fan for taking on field selfie with virat kohli | IND vs WI : 'विराटसेल्फी' पडणार महागात; तुरुंगाची हवा खावी लागणार...

IND vs WI : 'विराटसेल्फी' पडणार महागात; तुरुंगाची हवा खावी लागणार...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमोहम्मद मैदानात आला आणि कोहली जवळ गेला. त्याने कोहलीलाल मिठी मारण्याचा प्रयत्न केला.

हैदराबाद, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा कर्णधार विराट कोहली याचे बरेच फॅन्स आहेत. कोहली जिथे दिसेल तिथे त्याला भेटण्याची या फॅन्सची इच्छा असते. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीला भेटण्याची आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढण्याची इच्छा पूर्ण केली. पण ही इच्छा आता त्याला चांगलीच महागात पडणार आहे. कारण त्याच्याविरोधात तक्रार दाखल झाली असून त्याला आता तुरुंगाची हवाही खायला लागू शकते, असे म्हटले जात आहे. 

आंध्र प्रदेशच्या कडप्पा या जिल्ह्यातून मोहम्मद नावाचा युवा तरूण वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना पाहण्यासाठी आला होता. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे क्षेत्ररक्षण होते. त्यावेळी कोहली त्याला आपल्यापासून काही अंतरावर क्षेत्ररक्षण करताना दिसला. त्यावेळी मोहम्मदने सुरक्षारक्षकांना चुकवत थेट मैददान गाठले आणि त्याने कोहलीबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला.

मोहम्मद मैदानात आला आणि कोहली जवळ गेला. त्याने कोहलीलाल मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कोहलीबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्नही केला. त्यावेळी कोहली मोहम्मदला चांगलाच घाबरला होता. काही वेळात पोलीस मैदानात आले आणि त्यांनी मोहम्मदला पकडले. आता मोहम्मदला अटक केली असून त्याच्यावर आता खटला चालणार आहे.

Web Title: IND vs WI: cricket case filed against fan for taking on field selfie with virat kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.