Ind vs SA 5th ODI : 500 खेळाडूंना तंबूत पाठविणारा पहिला भारतीय विकेटकीपर बनला एमएस धोनी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 12:24 PM2018-02-14T12:24:16+5:302018-02-14T12:25:22+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs SA 5th ODI :dhoni became first indian wicket keeper to 500 dismissals in list a cricket | Ind vs SA 5th ODI : 500 खेळाडूंना तंबूत पाठविणारा पहिला भारतीय विकेटकीपर बनला एमएस धोनी

Ind vs SA 5th ODI : 500 खेळाडूंना तंबूत पाठविणारा पहिला भारतीय विकेटकीपर बनला एमएस धोनी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पोर्ट एलिझाबेथ- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने नवा इतिहास रचला आहे. पाचव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर भारतानं 73 धावांनी विजय मिळवत वनडे मालिकेवर 4-1 ने कब्जा मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेत वनडे क्रिकेटमधील भारताचा हा पहिला मालिका विजय ठरला आहे. भारतीय टीमने सगळ्यात आधी 1992मध्ये दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. त्यानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत कधीही मालिका जिंकली नाही. दरम्यान, भारताने 2006मध्ये दक्षिण आफ्रिकेत टी-20 सामना जिंकला होता पण तो एकेरी सामना होता. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने मॅच जिंकली. मोहम्मद अझरूद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड किंवा महेंद्रसिंह धोनी जे करू शकते नाहीत, ते विराट कोहलीने करून दाखविलं. 

मॅचमध्ये टीम इंडियाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. रोहित शर्मा पोर्ट एलिझाबेथमध्ये शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला. भारतीय टीम लोगोपाठ 9 वेळा द्विपक्षीय सीरीज जिंकणारी दुसरी टीम बनली आहे. वेस्टइंडिज पहिल्या स्थानी आहे. या मॅचमध्ये विकेटकीपिंग करणाऱ्या भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनेही एक मोठा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. 500 खेळाडूंना तंबूत पाठविण्याचा विक्रम धोनीने आपल्या नावे केला आहे. हा रेकॉर्ड कमावत धोनी सर्वात जास्त विकेट घेणार पहिला भारतीय विकेटकीपर बनला आहे. जगभरातील खेळाडूंमध्ये धोनी आता 9 व्या स्थानी आहे. धोनीने 375 कॅच घेतले आहेत तर 125 खेळाडूंना स्टम्प आऊट केलं. 

25 वर्षानंतर मिळालेला हा विजय जबरदस्त- विराट कोहली
'विजयामुळे मी प्रचंड आनंदी आहे. हे आमची सांघिक कामगिरी होती'. आपल्या संघाने प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी केली असल्याची शाबासकी यावेळी विराट कोहलीने दिली. आम्ही फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रात 100 टक्के कामगिरी केली आहे असंही विराटने सांगितलं. पुढे तो बोलला की, 'या सामन्यात एका संघावर मालिका गमावण्याचा दबाव होता आणि तो दक्षिण आफ्रिका होता. त्यांच्या छोट्या छोट्या चूका आम्हाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी देतील हे आम्हाला माहिती होतं'.

Web Title: Ind vs SA 5th ODI :dhoni became first indian wicket keeper to 500 dismissals in list a cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.