IND vs AUS: Virat Kohli told when he will retire, watch the video | IND vs AUS : विराट कोहलीने सांगितलं कधी घेणार निवृत्ती, पाहा हा व्हिडीओ
IND vs AUS : विराट कोहलीने सांगितलं कधी घेणार निवृत्ती, पाहा हा व्हिडीओ

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी कसोटी मालिका जिंकत इतिहास रचला आहे. त्यामुळे या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली निवृत्ती घेईल, असे कुणालाही वाटणार नाही. पण एकदिवसीय मालिकेच्या पूर्वसंध्येला त्याने आपल्या निवृत्तीबाबत भाष्य केले आहे.

 


आपल्या निवृत्तीबाबत कोहली म्हणाला की, " मी आतापर्यंत भरपूर क्रिकेट खेळलो आहे, असे मला वाटत नाही. गेल्या पाच वर्षांत मी पुरेसे क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे जेव्हा मला वाटेल की आता बॅट हातात धरू नये, त्यावेळी मी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा निर्णय घेईल. पण सध्याच्या घडीला तरी माझा तसा विचार नक्कीच नाही. "

पंड्या व राहुलचे कोहलीकडून समर्थन
कॉफी विथ करण कार्यक्रमात केलेली आक्षेपार्ह विधानं क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांनी केल्याचे म्हटले गेले. त्यामुळे त्यांच्यावर आता बीसीसीआय कारवाई करणार असल्याचे म्हटले जात आहे. एकिकडे बीसीसीआय कडक भूमिका घेत असताना याप्रकरणी भारताचा कर्णधार विराट कोहलीने मात्र पंड्या आणि राहुलचे समर्थन केले आहे. 

 

Web Title: IND vs AUS: Virat Kohli told when he will retire, watch the video
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.