IND vs AUS 2nd Test : विराट कोहलीचा 'हा' विक्रम अचंबित करणारा

IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कर्णधारपदाची इनिंग्ज सुरू केली आणि 2018 मध्ये त्याने येथे कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 12:55 PM2018-12-16T12:55:23+5:302018-12-16T12:56:21+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 2nd Test: Virat Kohli's is a first Asian batsman to score a century in Aus, Eng & SA in same year. | IND vs AUS 2nd Test : विराट कोहलीचा 'हा' विक्रम अचंबित करणारा

IND vs AUS 2nd Test : विराट कोहलीचा 'हा' विक्रम अचंबित करणारा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देविराट कोहलीच्या एका शतकाने अनेक विक्रम केलेपर्थवर शतक करणारा तो तेंडुलकरनंतर पहिलाच भारतीयऑस्ट्रेलियात सहा कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी

पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहलीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कर्णधारपदाची इनिंग्ज सुरू केली आणि 2018 मध्ये त्याने येथे कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. गेल्या चार वर्षांत कोहलीने विक्रमांचे अनेक शिखर सर केले. त्याची प्रचिती दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळातही आहे. कसोटीत सर्वात जलद 25 शतकांचा पल्ला गाठण्याचा विक्रम, 26 वर्षांनंतर पर्थवर शतक झळकावणारा पहिला भारतीय, ऑस्ट्रेलियात सहा कसोटी शतक... असे अनेक विक्रम त्याने रविवारी नोंदवले. मात्र, हे शतक त्याला  एकमेव.. अद्वितीय! बनवते.

कोहलीने 2018 मधील पाचवे कसोटी आणि सर्व प्रकारच्या फॉरमॅटमधील 11वे शतक झळकावले. 3 बाद 172 धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात झटका बसला. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला बाद केले. त्यानंतर कोहलीने जबाबदारीने खेळ करताना भारताच्या धावांचा वेग कायम राखला. कोहलीने 123 धावांच्या खेळीत 13 चौकार व एक षटकार खेचला.  कोहलीचे हे ऑस्ट्रेलियातील सहावे कसोटी शतक ठरले. तेंडुलकरनेही ऑस्ट्रेलियात यजमानांविरुद्ध सहा कसोटी शतकं झळकावली आहेत. यासह 1992नंतर पर्थवर कसोटी शतक झळकावणारा कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 1992 मध्ये तेंडुलकरने अशी कामगिरी केली होती.

पण, या विक्रमांपलिकडे विराट कोहलीने आणखी एक विक्रम नावावर केला. एकाच वर्षी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात शतक झळकावणारा तो पहिलाय आशियाई फलंदाज ठरला आहे. त्याशिवाय ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात कसोटी सामना जिंकणाराही तो पहिलाच आशियाई कर्णधार आहे. 



कोहलीने कर्णधार म्हणून 34 वे शतक झळकावले. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग 41 शतकांसह आघाडीवर आहे. मात्र, यासाठी त्याने 376 डाव खेळले, परंतु कोहलीने 145 डावांमध्ये 34 शतकं केली आहेत. 
 

Web Title: IND vs AUS 2nd Test: Virat Kohli's is a first Asian batsman to score a century in Aus, Eng & SA in same year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.