IND vs AUS 2nd Test: नाणेफेकीचा कौल ठरणार महत्त्वाचा

पर्थमधील मैदान नवे आहे. येथील खेळपट्टी वेगवान व चेंडूला उसळी मिळणारी राहील, अशी चर्चा आहे. जर खेळपट्टी तशी असेल तर उभय संघांना समान संधी राहील.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 01:36 AM2018-12-14T01:36:34+5:302018-12-14T06:23:55+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 2nd Test: Important to be tossed | IND vs AUS 2nd Test: नाणेफेकीचा कौल ठरणार महत्त्वाचा

IND vs AUS 2nd Test: नाणेफेकीचा कौल ठरणार महत्त्वाचा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सौरव गांगुली

अ‍ॅडलेडमध्ये भारताने शानदार खेळ केला. पुजाराने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. स्ट्राईक रेटबाबतच्या चर्चेला अर्थ नाही, विशेषत: विदेशात. धावा काढण्यासोबतच नवा चेंडू खेळून काढणे आणि पहिले सत्र या बाबी महत्त्वाच्या ठरतात. जोहान्सबर्गमध्ये खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल असताना पुजाराचे योगदान विसरता येणार नाही आणि अ‍ॅडलेडमध्ये भारताची ४ बाद ४० अशी स्थिती असताना स्ट्राईक रेटला महत्त्व उरत नाही.

पर्थमधील मैदान नवे आहे. येथील खेळपट्टी वेगवान व चेंडूला उसळी मिळणारी राहील, अशी चर्चा आहे. जर खेळपट्टी तशी असेल तर उभय संघांना समान संधी राहील. अ‍ॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज फिरकी माऱ्याविरुद्ध दडपणाखाली असल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलियन खेळाडू फिरकीच्या तुलनेत वेगवान मारा अधिक समर्थपणे खेळतात, हे निदर्शनास आले आहे. पण, भारतीय वेगवान गोलंदाजी माऱ्याला कमी लेखता येणार नाही. ते २० बळी घेण्यास सक्षम आहेत. जर खेळपट्टीवर पुरेशी हिरवळ असेल तर वेगवान गोलंदाज प्रभावी ठरतील. भारताने जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल होती. एकवेळ तर खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण असल्याचे भासत होते. पर्थमध्ये चार गोलंदाजांची निवड करताना भारतीय संघ द्विधा मन:स्थितीत राहील. हिरवळ असल्यामुळे भारताने जडेजाऐवजी भुवीला संधी द्यायला हवी.

नाणेफेकीचा कौल कुणाला मिळतो, हे महत्त्वाचे ठरेल. जोहान्सबर्ग व अ‍ॅडलेडचा अनुभव बघता नाणेफेक जिंकली तर भारत फलंदाजी स्वीकारण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाची सध्याची फलंदाजी बळकट नाही. ते चौथ्या डावातील फलंदाजीचे दडपण सहन करण्यास सक्षम नाही. विराट कोहली संघात कुणाला संधी देतो, याबाबत उत्सुकता आहे. रोहित शर्माच्या स्थानी हनुमा विहारीला संधी मिळणार, यात कुठली शंका नाही. पर्थ कसोटीला मुकावे लागणार असल्यामुळे रोहित निराश झाला असेल. कसोटी फलंदाज म्हणून त्याला आपले स्थान निश्चित करण्यासाठी पूर्ण मालिका खेळायला मिळणे आवश्यक होते. त्याने यापूर्वी पर्थमध्ये धावा केल्या आहेत आणि त्याची पुनरावृत्ती करण्यास तो उत्सुक होता. मालिकेतील हा अतिशय महत्त्वाचा सामना आहे. पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाला संधी आहे; पण भारताने मालिका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. (गेमप्लॅन)

Web Title: IND vs AUS 2nd Test: Important to be tossed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.