शाही परिवाराच्या उपस्थितीत पार पडला उद्घाटन सोहळा

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे बुधवारी इंग्लंडच्या शाही परिवाराच्या उपस्थितीमध्ये अधिकृतपणे उद्घाटन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 06:38 AM2019-05-30T06:38:22+5:302019-05-30T06:38:34+5:30

whatsapp join usJoin us
Inauguration ceremony of the royal family was inaugurated | शाही परिवाराच्या उपस्थितीत पार पडला उद्घाटन सोहळा

शाही परिवाराच्या उपस्थितीत पार पडला उद्घाटन सोहळा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे बुधवारी इंग्लंडच्या शाही परिवाराच्या उपस्थितीमध्ये अधिकृतपणे उद्घाटन झाले. लंडन येथे दिमाखात झालेल्या उद्घाटन सोहळ्यामध्ये गाण्यांच्य सादरीकरणापासून प्रदर्शनीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन झाले. या सोहळ्याच्या सुरुवातीलाच स्पर्धेतील सहभागी संघांच्या कर्णधारांना मंचावर बोलाविण्यात आले. इंग्लंडचा प्रसिद्ध गायक जॉन न्यूमॅन याने जबरदस्त सादरीकरण करतना उद्घाटन सोहळ्यात रंग भरले. या शानदार सादरीकरणानंतर ‘६० सेकंद चॅलेंज’ असा मजेशीर क्रिकेट सामना खेळविण्यात आला, ज्यामध्ये यजमान इंग्लंड संघाने बाजी मारली.
‘६० सेकंद चॅलेंज’ सामन्यात प्रत्येक संघाकडून दोन सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रत्येक संघाला एका मिनिटात जास्तीत जास्त धावा काढायच्या होत्या. भारताकडून या सामन्यात माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे आणि बॉलिवूड स्टार फरहान अख्तर यांनी सहभाग घेतला. मात्र या दोघांना सर्वात कमी १९ धावाच काढता आल्याने भारताचा संघ तळाला राहिला. इंग्लंडने यामध्ये बाजी मारली. त्यांच्या केविन पीटरसनने सर्वाधिक ७४ धावांचा तडाखा दिला. वेस्ट इंडिजकडून विव रिचडर््स आणि महान अ‍ॅथलिट योहान ब्लॅक यांनी सहभाग घेताना ४७ धावा कुटल्या. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या आॅस्टेÑलियाने ब्रेट लीच्या जोरावर ६९ धावा ठोकल्या.
।क्वीनसोबत फोटोशूट
उद्घाटन सोहळ्यादरम्यान विश्वचषक स्पर्धेतील
सहभागी १० संघांच्या कर्णधारांचे इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ यांच्यासोबत भेट करुन दिली. यावेळी प्रिन्स हॅरी यांनी प्रत्येक कर्णधारासोबत हस्तांदोलनही केले. महाराणी एलिझाबेथ यांच्यासह सर्व कर्णधारांचे एकत्रित छायाचित्र काढून झाल्यानंतर गतवेळचा विश्वचषक विजेता आॅस्टेÑलियाचा तत्कालीन कर्णधार मायकल क्लार्क
याने विश्वचषक आयसीसीकडे सोपविली.

Web Title: Inauguration ceremony of the royal family was inaugurated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.