इम्रान ताहीर युवा-अनुभवी खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत

जेव्हा आपण सलग तीन सामने गमावतो तेव्हा संघात कितीही कौशल्य असले तरी पराभवावर तोडगा काढणे कठीण होऊन बसते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 04:18 AM2019-04-19T04:18:42+5:302019-04-19T04:19:04+5:30

whatsapp join usJoin us
Imran Tahir inspires young and experienced players | इम्रान ताहीर युवा-अनुभवी खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत

इम्रान ताहीर युवा-अनुभवी खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...
जेव्हा आपण सलग तीन सामने गमावतो तेव्हा संघात कितीही कौशल्य असले तरी पराभवावर तोडगा काढणे कठीण होऊन बसते. तथापि चेन्नई सुपरकिंग्सवर विजय मिळविण्याआधी सनरायजर्स हैदराबाद संघाचा संयम आणि सकारात्मकता पाहून मी प्रभावित झालो. कोच टॉम मूडी आणि कर्णधार केन विलियम्सन या दोघांनी परिणामाऐवजी प्रक्रिया राबविण्यावर भर दिला. ही सकारात्मक कृती प्रभावी निकाल देणारी ठरली.
महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीतही चेन्नई संघ बलाढ्य आहे. त्यांचा आमच्याविरुद्धचा रेकॉर्ड बुधवारच्या एकतर्फी लढतीआधी ८-२ असा होता. शेन वॉटसन आणि फाफ डुप्लेसिस यांनी केलेली सुरुवात धडाकेबाज होती. पण केनने जी शक्कल लढविली त्यामुळे गडी बाद होते गेले. आम्ही निर्धाव षटके टाकून धावा रोखू शकलो. केनचा विश्वास सार्थकी लागला. चेन्नईने पाठोपाठ गडी गमविल्यानंतर धोनीच्या अनुपस्थितीत हा संघ संकटाबाहेर पडण्यात अपयशी ठरला. राशिद खानच्या मार्गदर्शनात गोलंदाजांनी अप्रतिम मारा केला, त्यामुळे सीएसकेची जी अवस्था होती, ती पाहून आणखी ३५.४० धावा कमी होतील, असा अंदाज होता.
या मोसमात अनेकदा डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरेस्टो यांनी आमच्यासाठी तुफानी सुरुवात केली आहे. वॉर्नर वेगवान धावा घेण्यात तरबेज आहे. जॉनी फटकेबाजीच्या बळावर लवकर मोठी धावसंख्या उभारू शकतो. वॉर्नर बाद झाल्यानंतर जॉनीने जो समजूतदारपणा दाखविला तो वाखाणण्यासारखा आहे. इम्रान ताहीरचे भेदक चेंडू यशस्वीपणे टोलवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याची जबाबदारी पार पाडली. एखाद्या फलंदाजासाठी ही मोठी उपलब्धी करू शकते. इम्रानचा मारा फारच धोकादायक वाटतो. टी२० क्रिकेट युवा खेळाडूंचा खेळ समजला जात असला तरी इम्रानकडे पाहून असे म्हणता येणार नाही. २००९ मध्ये मी त्याला इंग्लिश कौंटी चॅम्पियशिपमध्ये पाहिले तेव्हापासून इम्रानमध्ये एखाद्या लहान मुलासारखा तोच जोश कायम दिसतो. मी लँकेशायरसाठी, तर तो हॅम्पशायरसाठी खेळायचा.
इम्रान हा आक्रमकवृत्ती, समर्पित भावना जोपासणारा कठोर मेहनत करण्याची तयारी असलेला आणि स्वत:च्या कामगिरीवर विश्वास बाळगणारा परफेक्ट खेळाडू आहे. त्यामुळेच गडी बाद केला की त्याची आनंद साजरा करण्याची सवय गगनात मावेनाशी असते. वय केवळ आकडा आहे, हे स्वत:च्या खेळातून सिद्ध करण्याचा त्याचा दरदिवशी प्रयत्न असतो. माझ्यामते इम्रान ताहीर हे
युवा आणि अनुभवी खेळाडूंसाठी प्रेरणास्पद व्यक्तिमत्त्व आहे. तो क्रिकेटसाठीच बनलेला असावा, याची खात्री पटते.

Web Title: Imran Tahir inspires young and experienced players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.