ICC World Twenty20: पाकिस्तानविरुद्ध एकही चेंडू न खेळता भारताच्या खात्यात दहा धावा

ICC World Twenty20: भारतीय महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 01:54 PM2018-11-12T13:54:19+5:302018-11-12T14:02:24+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Twenty20: India scored 10 runs without playing a shot against Pakistan | ICC World Twenty20: पाकिस्तानविरुद्ध एकही चेंडू न खेळता भारताच्या खात्यात दहा धावा

ICC World Twenty20: पाकिस्तानविरुद्ध एकही चेंडू न खेळता भारताच्या खात्यात दहा धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देपाकिस्तान महिला क्रिकेट संघाला दंडभारताला मिळाल्या दहा धावा

प्रॉव्हिडेन्स(गयाना) : भारतीय महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंडनंतर भारतीय महिला खेळाडूंनी पाकिस्तानवर दणदणीत विजयाची नोंद केली. भारताने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर 7 विकेट राखून विजय मिळवला. मिताली राजने अर्धशतकी खेळी करून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारत-पाकिस्तान हे शेजारी क्रिकेट मैदानावर समोरासमोर आले की तणावाचे वातावरण निर्माण होतेच. पण, रविवारी झालेल्या सामन्यात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या भारताच्या शून्य चेंडूंत 10 धावा झाल्या होत्या. 
 



पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 133 धावांचे ठेवले होते. पाकिस्तानकडून बिसमाह मारुफने 49 चेंडूत 53 तर निदा दरने 35 चेंडूत तडाखेबंद 52 धावांची खेळी केली.  या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला मैदानात उतरण्यापूर्वीच दहा धावा मिळाल्या. पाकिस्तानची फलंदाज डेंजर झोनमध्ये ( खेळपट्टीला नुकसान पोहोचवले) धावली आणि पंचांनी दोन वेळा 5-5 धावा वजा केले. त्यामुळे भारताच्या शून्य चेंडूंत 10 धावा झाल्या आहे. 

Web Title: ICC World Twenty20: India scored 10 runs without playing a shot against Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.