ICC World Cup 2019 : मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला आणलं अडचणीत; असं नेमकं काय झालं? 

ICC World Cup 2019: भारत-पाकिस्तान लढतीत हिटमॅन रोहित शर्माचा करिष्मा पाहायला मिळाला. रोहितनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची धु धु धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 10:03 AM2019-06-19T10:03:47+5:302019-06-19T10:04:23+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019:This is gonna get me into trouble; Rohit Sharma reaction on Mumbai Indians that tweet, Know why? | ICC World Cup 2019 : मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला आणलं अडचणीत; असं नेमकं काय झालं? 

ICC World Cup 2019 : मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला आणलं अडचणीत; असं नेमकं काय झालं? 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत-पाकिस्तान लढतीत हिटमॅन रोहित शर्माचा करिष्मा पाहायला मिळाला. रोहितनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची धु धु धुलाई केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध विजयाची मालिका सातव्या सामन्यातही कायम राखत भारतीयांनी चाहत्यांना फादर्स डे ला मोठी भेट दिली. मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला.  या सामन्यात भारतानं 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या, पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानला 40 षटकांत 212 धावाच करता आल्या. 

या सामन्यात 140 धावा चोपणाऱ्या रोहित शर्माला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर रोहितवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. रोहितनं या खेळीच श्रेय मुलगी समायराला दिले. तो म्हणाला," समायरा आयुष्यात आली आणि माझ्यातला माणूस अधिक प्रगल्भ झाला. मी सध्या आयुष्यातील सर्वात सुंदर फेजमध्ये आहे. माझ्या मुलीनं आयुष्यात आनंदाचा क्षण आणला. क्रिकेट खेळण्याचाही मी मनसोक्त आनंद लुटत आहे.'' बापमाणूस रोहितच्या या मतावर मुंबई इंडियन्सने एक ट्विट केलं. त्यावरून रोहितनं मला अडचणीत आणू नका, अशी विनंती  केली.




मुंबई इंडियन्सचे हे ट्विट रिट्विट करून रोहित म्हणाला,''या ट्विटमुळे मी अडचणीत सापडणार आहे. माझ्या यशामागे आणखी एक व्यक्ती आहे आणि तिला तुम्ही विसरत आहात.'' रोहितला त्याची पत्नी रितिकाबाबत सांगायचे होते. हा सर्व गमतीचा भाग होता, परंतु रोहितचं हे ट्विट सध्या चांगलच व्हायरल होत आहे. 

 

हिटमॅन रोहितचा पॉवरफुल शो! 

  • भारत-पाक लढतील हिटमॅन रोहित शर्माची क्लासिक खेळी
  • रोहितने ११३ चेंडूंत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने चोपल्या १४० धावा
  • लोकेश राहुलसह सलामीला १३६ धावांची विक्रमी भागीदारी
  • रोहितची खेळी ठरली ओल्ड ट्रॅफर्डवरील तिसरी सर्वोत्तम खेळी
  • सर व्हिव्ह रिचर्ड्स ( १८४, वि. इंग्लंड, १९८४) आणि ख्रिस ॲथे ( १४२*, वि. न्यूझीलंड, १९८६) यांच्यानंतर आता रोहितच..
  • इंग्लंडमध्ये वन डे क्रिकेटध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा भारतीय
  • रोहितने १८ डावांत हा पल्ला गाठला, तर शिखर धवनने १९ डावांत ही कामगिरी केली होती. 
  • रोहितचे हे २४ वे वन डे शतक ठरले आणि या पल्ला गाठण्यासाठी सर्वात कमी डाव खेळलेला तो चौथा फलंदाज
  • हाशीम आमला ( १४२ डाव), विराट कोहली ( १६१ डाव) आणि एबी डिव्हिलियर्स ( १९२ डाव) आघाडीवर, पण सचिन तेंडुलकरला ( २१९ डाव ) टाकलं मागे
  • पाकिस्तानविरुद्ध वन डेत सलग दोन शतक झळकावणारा रोहित पहिलाच भारतीय. त्याने २०१८ च्या आशिया कपमध्ये १११ धावा चोपल्या
  • वन डेत सर्वात अधिक १५वेळा १२५ किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा रोहित दुसरा फलंदाज. सचिन तेंडुलकर (१९) आघाडीवर
  • पाकिस्तानविरुद्ध भारतीयाने केलेली पाचवी सर्वोत्तम खेळी. १८३ धावांसह विराट कोहली आघाडीवर

Web Title: ICC World Cup 2019:This is gonna get me into trouble; Rohit Sharma reaction on Mumbai Indians that tweet, Know why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.