ICC World Cup 2019 : भारताविरुद्धच्या लढतीसाठी विंडीजच्या खेळाडूचे दोन खास पाहुण्यांना आमंत्रण

ICC World Cup 2019 : कार्लोस ब्रॅथवेटच्या संस्मरणीय खेळीनंतरही वेस्ट इंडिज संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध निसटता पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 10:38 AM2019-06-26T10:38:45+5:302019-06-26T11:04:37+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 :  Watch: Kids imitate Cottrell’s salute celebration, West Indies pacer invites them for India game | ICC World Cup 2019 : भारताविरुद्धच्या लढतीसाठी विंडीजच्या खेळाडूचे दोन खास पाहुण्यांना आमंत्रण

ICC World Cup 2019 : भारताविरुद्धच्या लढतीसाठी विंडीजच्या खेळाडूचे दोन खास पाहुण्यांना आमंत्रण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

साऊदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : कार्लोस ब्रॅथवेटच्या संस्मरणीय खेळीनंतरही वेस्ट इंडिज संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध निसटता पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे विंडीजच्या उपांत्य फेरीच्या आशाही जवळपास संपुष्टात आल्या आहेत, परंतु उर्वरित तीन सामन्यांत विजय मिळण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्याच निर्धाराने विंडीज गुरुवारी बलाढ्य भारतीय संघाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या सामन्यासाठी विंडिजचा गोलंदाज शेल्डन कोट्रेलने दोन खात पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. 

कोट्रेलची सेलिब्रेशन करण्याची स्टाईल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. जमैकाच्या संरक्षण दलातील सदस्य असलेल्या कोट्रेल हा आपल्या सहकाऱ्यांप्रती असलेल्या प्रेमापोटी असे सेलिब्रेशन करतो. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्यानं 56 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या. 

''हे सैनिकांची सॅल्युट करण्याची पद्धत आहे. मी प्रोफेशनली सैनिक आहे. जमैका सरंक्षण दलाप्रती असलेल्या माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मी सामन्यात सॅल्युट करतो,'' असे कोट्रेलने सांगितले होते. त्याची ही स्टाईल सध्या अनेक जण कॉपी करत आहेत. एक लहान मुलगा व मुलगी कोट्रेलच्या स्टाईलची कॉपी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



या व्हिडीओ एका व्यक्तीनं सोशल मीडियावर पोस्ट केला आणि कोट्रेलला या मुलांसाठी त्याच्या नावाची जर्सी देशील का असे विचारले. कोट्रेलने त्यावर उत्तर देताना या दोघांनाही भारताविरुद्धची लढत पाहण्याचे आमंत्रण दिले.'' 

भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त? नेट्समध्ये केली गोलंदाजी!
वेस्ट इंडिजचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची वार्ता आली आहे. संघाचा प्रमुख गोलंदा भुवनेश्वर कुमार मंगळवारी इंडोअर नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसला. त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीला संघात खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानं त्याचं सोनंही केलं. शिवाय भुवीची दुखापत लक्षात घेता नेट्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी बीसीसीआयनं नवदीप सैनीला बोलावून घेतले होते. पण, आता भुवीलाच गोलंदाजी करताना पाहिल्यानंतर चाहते त्याच्या पुनरागमनाकडे लक्ष ठेवून आहेत.

Web Title: ICC World Cup 2019 :  Watch: Kids imitate Cottrell’s salute celebration, West Indies pacer invites them for India game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.