ICC World Cup 2019 : विराट कोहली मोडणार सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रम

सचिन निवृत्त झाल्यावर त्याचे काही विश्वविक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोडीत काढले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 04:31 PM2019-06-26T16:31:50+5:302019-06-26T16:35:53+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Virat Kohli ready to break another world record of Sachin Tendulkar | ICC World Cup 2019 : विराट कोहली मोडणार सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रम

ICC World Cup 2019 : विराट कोहली मोडणार सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेट विश्वात एकेकाळी सर्वाधिक विश्वविक्रम भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर होते. पण सचिन निवृत्त झाल्यावर त्याचे काही विश्वविक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोडीत काढले आहेत. आता अजून एक सचिनचा विश्वविक्रम कोहलीला खुणावतो आहे. भारताचा उद्या वेस्ट इंडिजबरोबर सामना होणार आहे. या सामन्यात कोहली सचिनचा एक विश्वविक्रम मोडण्यासाठी सज्ज झालेला आहे.




वेस्ट इंडिजबरोबरच्या सामन्यात भारताचेच पारडे जड आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला आणखी एक विश्वविक्रम नोंदवण्याची संधी आहे. या सामन्यातून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 20 हजार धावांचा विक्रम नावावर करण्याची संधी आहे आणि त्यासाठी त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध ३७ धावांची खेळी करावी लागेल.

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कोहलीनं वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करण्याचा विक्रम नावावर केला होता. आता त्याला सर्वात जलद 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम नावावर करून सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या महान फलंदाजांना मागे टाकण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा कोहली जगातील बारावा, तर तेंडुलकर ( 34357) आणि राहुल द्रविड ( 24208) यांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. कोहलीच्या नावावर वन डेत 11020, कसोटीत 6613 आणि ट्वेंटी-20 2263 धावा आहेत. 

तेंडुलकर आणि लारा यांनी सर्वात कमी म्हणजे 453 डावांत 20 हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 415 डाव ( 131 कसोटी, 222 वन डे आणि 62 ट्वेंटी-20) फलंदाजी केली आहे. त्यात त्याच्या नावावर 19896 धावा आहेत. तेंडुलकर आणि लारा यांच्यानंतर या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंगचा ( 468) नंबर येतो. 

तत्पूर्वी,  विराटने वन डे क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराटने केवळ 222 डावांत 11 हजार धावा पूर्ण केल्या. त्याबरोबरच तो सर्वात वेगाने 11 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. विराट हा सर्वात कमी म्हणजे 222 डावांत 11 हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने 276 डावांत 11 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्याबरोबरच 11 वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हा पल्ला पार केला आहे. 

Web Title: ICC World Cup 2019: Virat Kohli ready to break another world record of Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.