ICC World Cup 2019 : थांबायचं नाय गड्या, घाबरायचं नाय; दुखापतीनंतर 'गब्बर'ची भावनिक पोस्ट

ICC World Cup 2019 : भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मंगळवारी मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 01:32 PM2019-06-12T13:32:24+5:302019-06-12T13:32:41+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : Shikhar Dhawan emotional and inspiring tweet after injured in match against Australia | ICC World Cup 2019 : थांबायचं नाय गड्या, घाबरायचं नाय; दुखापतीनंतर 'गब्बर'ची भावनिक पोस्ट

ICC World Cup 2019 : थांबायचं नाय गड्या, घाबरायचं नाय; दुखापतीनंतर 'गब्बर'ची भावनिक पोस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मंगळवारी मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ऑसीविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर धवनला ही दुखापत झाली होती. मंगळवारी त्याच्या या दुखापतीचा वैद्यकिय अहवाल आला आणि त्याच्या अंगठ्याला फॅक्चर झाल्याचे समोर आले. त्यामुळे बांगलादेश ( 2 जुलै) किंवा श्रीलंका ( 6 जुलै) यांच्याविरुद्ध सामन्यापर्यंत धवन खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल, याची शक्यता कमीच आहे. या दुखापतीमुळे खचून न जाता धवननं पुन्हा गगन भरारी घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक भावनिक कविता पोस्ट केली आहे.


दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्घचे सामने जिंकून विश्वचषक स्पर्धेत जोरदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत घणाघाती शतकी खेळी करणारा डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे धवनला तीन आठवडे संघाबाहेर राहावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लढतीत शिखर धवनने शानदार शतकी खेळी केली होती. त्याने रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीसमवेत केलेल्या मोठ्या भागीदाऱ्यांमुळे भारतीय संघाला साडेतीनशेपार मजल मारता आली होती. मात्र या खेळीदरम्यान पॅट कमिन्सचा एक उसळता चेंडू हातावर बसून शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापत बळावल्याने तो क्षेत्ररक्षणालाही येऊ शकला नव्हता. 


त्याच्या हाताचा स्कॅन केल्यानंतर ती दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर धवनला पुढील तीन आठवडे क्रिकेटपासून दूर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. धवनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीमध्ये लोकेश राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. धवन या दुखापतीनंतर खचला नाही. त्यानं दमदार कमबॅक करण्याचा निर्धार कवितेच्या वाटे व्यक्त केला आहे. 


 

Web Title: ICC World Cup 2019 : Shikhar Dhawan emotional and inspiring tweet after injured in match against Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.