ICC World Cup 2019 : शकिब-मुशफिकरचा 'विराट' पराक्रम, कोहली-धोनीला टाकलं मागे

ICC World Cup 2019 : शकिब अल हसन आणि मुशफीकर रहमान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची विक्रमी भागीदारी केली. या सह या दोघांनी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना मागे टाकत वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रम नावावर केला.  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 06:33 PM2019-06-02T18:33:36+5:302019-06-02T18:34:24+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : Shakib Al Hasan broke Virat Kohli record, he score most Runs In World Cup Among Current Asian Players | ICC World Cup 2019 : शकिब-मुशफिकरचा 'विराट' पराक्रम, कोहली-धोनीला टाकलं मागे

ICC World Cup 2019 : शकिब-मुशफिकरचा 'विराट' पराक्रम, कोहली-धोनीला टाकलं मागे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आशियाई टायगर म्हणून ओळख असलेल्या बांगलादेश संघाने रविवारी वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हैराण केले. आफ्रिकेने दिलेले प्रथम फलंदाजीचे आव्हान स्वीकारत बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार यांच्या दमदार सलामीनंतर अनुभवी शकिब अल हसन आणि मुशफीकर रहमान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची विक्रमी भागीदारी केली. या सह या दोघांनी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना मागे टाकत वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रम नावावर केला.  

नाणेफेक जिंकून आफ्रिकेने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांचे हे आव्हान स्वीकारत बांगलादेशने सकारात्मक सुरुवात केली. इक्बाल व सरकार यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या. नवव्या षटकात फाहलेक्वायोने बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्याने क्विंटन डी'कॉककरवी इक्बालला ( 16) झेलबाद केले. त्यानंतर अवघ्या 15 धावांची भर घालून सरकारही माघारी परतला. ख्रिस मॉरिसने त्याला 42 धावांवर बाद केले. 

त्यानंतर शकिब व मुशफिकर यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेतील ही बांगलादेशच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. बांगलादेश संघाने दोन विकेट गमावून 200 धावा जेव्हा जेव्हा केल्या तेव्हा त्यांची जयपराजयाची आकडेवारी ही 19-5 अशी राहिली आहे. त्यामुळे आफ्रिकेच्या गोटात चिंता निर्माण झाली आहे. इम्रान ताहीरने ही जोडी तोडली. त्याने शकिबला 75 धावांवर बाद केले. त्यानंतर मोहम्मद मिथून ( 21) माघारी परतला. मुशफिकर एका बाजूनं खिंड लढवत होता, परंतु त्याची ही घोडदौड फेहलुक्वायोनं रोखली. 43व्या षटकात फेहलुक्वायोनं 78 धावा करणाऱ्या मुशफिकरला बाद केले. 

शकिबने 75 धावांची खेळी करून वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या खेळत असलेल्या आशियाई खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर केला. मुशफिकरनेही 78 धावांच्या खेळीसह या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. 


 

Web Title: ICC World Cup 2019 : Shakib Al Hasan broke Virat Kohli record, he score most Runs In World Cup Among Current Asian Players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.