ICC World Cup 2019 : रोहित शर्माचं पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारं ट्विट, नेटिझन्सचा पाठिंबा

ICC World Cup 2019: भारतीय संघाला गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात लगेचच धक्का बसला होता. भारताचा सलामीवीर रोहित शर्माला (18) सहाव्या षटकात झेलबाद होऊन माघारी परतावे लागले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 02:26 PM2019-06-28T14:26:29+5:302019-06-28T14:26:58+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Rohit Sharma's tweet to express dissatisfaction with umpire's decision in India vs West Indies match | ICC World Cup 2019 : रोहित शर्माचं पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारं ट्विट, नेटिझन्सचा पाठिंबा

ICC World Cup 2019 : रोहित शर्माचं पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारं ट्विट, नेटिझन्सचा पाठिंबा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाला गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात लगेचच धक्का बसला होता. भारताचा सलामीवीर रोहित शर्माला (18) सहाव्या षटकात झेलबाद होऊन माघारी परतावे लागले होते. केमार रोचच्या गोलंदाजीवर तो यष्टिरक्षक शे होप्सच्या हाती झेल देऊन बाद झाला. पण, त्याला बाद देण्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. रोचने टाकलेला इनस्विंग रोहितच्या बॅट अन् पॅडच्या मधून थेट यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. मैदानावरील पंचांनी यावर निकाल दिला नाही पण विंडीजनं तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. 


त्यात चेंडू बॅट अन् पॅडच्या मधून जाताना दिसत होता. पण, तो बॅटीला चाटून गेली की पॅडला याबाबत स्पष्टता नव्हती, तरीही तिसऱ्या पंचांनी रोहितला बाद दिले आणि नेटिझन्सने टीकेची झोड उठवली. रोहित नाबाद असल्याचे दिसत असूनही पंचानी त्याला बाद ठरवले. हा सामना रोहितची पत्नी रितिकाही पाहत होती. रोहितला तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यावर रितिका चांगली भडकली होती. या गोष्टीच्या रिप्लेमध्ये अल्ट्रा एज वापरण्यात आले होते. पण यामध्येही रोहित आऊट आहे किंवा नाही हे स्पष्ट होत नव्हते.
शुक्रवारी रोहितने पंचांच्या त्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारे ट्विट केले.









हार्दिक पांड्याला माझ्या मार्गदर्शनाची गरज, पाकिस्तानी खेळाडूचा दावा
दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानेवेस्ट इंडिजवर दममाखदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ 11 गुणांसह उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 268 धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाटलाग करताना वेस्ट इंडिजचे फलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांच्या वेगवान गोलंदाजीचे शिकार ठरले. भारताच्या अचूक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजला भारताचे आव्हान पेलवले नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला.


सध्याच्या गुणतक्त्यानुसार ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत आपले स्थान पक्कं केलं आहे. न्यूझीलंड 11 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. भारताचे तीन सामने शिल्लक आहेत आणि ते 11 गुणांसह दुसऱ्या, तर यजमान इंग्लंड 7 सामन्यांत 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडला नमवून 7 सात सामन्यांत 7 गुणांसह सहाव्या स्थानी आगेकूच केली आहे. पण, त्यांना इंग्लंडच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. इंग्लंडचा पुढील सामना भारताविरुद्ध होणार आहे आणि त्यात भारताने विजय मिळवल्यास पाकिस्तानच्या मार्गातील मोठा अडथळा दूर होऊ शकतो.

Web Title: ICC World Cup 2019: Rohit Sharma's tweet to express dissatisfaction with umpire's decision in India vs West Indies match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.