ICC World Cup 2019: इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यासाठी रोहित शर्मा सज्ज

हा इतिहास रचताना तो सर व्हिव रीचर्ड्स, शिखर धवन आणि केन विल्यम्सन यांना पिछाडीवर टाकू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 10:18 PM2019-06-25T22:18:16+5:302019-06-25T22:19:03+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Rohit Sharma ready to create history in England | ICC World Cup 2019: इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यासाठी रोहित शर्मा सज्ज

ICC World Cup 2019: इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यासाठी रोहित शर्मा सज्ज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताचा सलामीवीर रोहित शर्माने विश्वचषकाची दणक्यात सुरुवात केली. आतापर्यंतच्या पाच विश्वचषकातील सामन्यांमध्ये रोहितने दोन शतके लगावली आहेत, तर एक अर्धशतकही पूर्ण केले आहे. पण गेल्या अफगानिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये मात्र रोहितला चमक दाखवता आली नव्हती. पण रोहितसारखा फलंदाज कधीही पुनरागमन करू शकतो. रोहित जर फॉर्मात परतला तर तो इंग्लंडमध्ये इतिहास रचू शकतो. हा इतिहास रचताना तो सर व्हिव रीचर्ड्स, शिखर धवन आणि केन विल्यम्सन यांना पिछाडीवर टाकू शकतो.

इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या विदेशी खेळाडूंच्या यादीमध्ये सर रिचर्ड्स, रोहित, शिखर आणि  विल्यम्सन हे सध्याच्या घडीला संयुक्तरीत्या अव्वल स्थानावर आहेत. कारण या चौघांनीही एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार शतके लगावली आहेत. भारताचा यापुढे सामना २७ जूनला वेस्ट इंडिजबरोबर होणार आहे. या सामन्यात जर रोहित़ने शतक लगावले तर रोहित इतिहास रचू शकतो. कारण इंग्लंडमध्ये एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके लगावणारा रोहित हा एकमेव विदेशी फलंदाज ठरणार आहे.

इंग्लंडमध्ये रोहितची कामगिरी आतापर्यंत चांगली झालेली आहे. आतापर्यंत रोहित इंग्लंडमध्ये १९ एकदिवसीय सामने खेळला आहे. या १९ सामन्यांमध्ये ६७.१३च्या सरासरीने १००७ धावा केल्या आहेत. विश्वचषकामध्ये रोहितने आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांमध्ये दोन शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने ३२० धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्याविरुद्ध त्याने ११२ धावांची खेळी साकारली होती. त्याचबरोबर पाकिस्तानबरोबर रोहितने १४० धावांची धमाकेदार खेळी साकारली होती. विश्वचषकातील आगामी सामन्यांमध्ये जर रोहितने शतक झळकावले तर त्याला इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

क्रिकेटर नव्हे तर अ‍ॅक्टर रोहित शर्मा
अफगाणिस्तानविरुद्धचे अपयश सोडले तर भारताचा सलामीवीर रोहित शर्मानं आपल्या फलंदाजीचा दम वर्ल्ड कप स्पर्धेत दाखवला आहे. त्यानं पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ येत्या गुरुवारी वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे आणि या लढतीत हिटमॅनची चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाने रविवारी प्रवास केला. पास तासाच्या या प्रवासात रोहितचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला. या प्रवासात दम्शराज हा खेळ खेळताना दिसला. त्याच्या या अ‍ॅक्टींग स्कीलनं सर्वांची मनं जिंकली. 

Web Title: ICC World Cup 2019: Rohit Sharma ready to create history in England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.