ICC World Cup 2019: रिषभ पंतला करावी लागेल मोठी खेळी

श्रीलंकाला फलंदाजीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 01:24 AM2019-07-06T01:24:00+5:302019-07-06T01:24:12+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Rishabh Pantal has to make a big knock | ICC World Cup 2019: रिषभ पंतला करावी लागेल मोठी खेळी

ICC World Cup 2019: रिषभ पंतला करावी लागेल मोठी खेळी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सुनील गावसकर लिहितात...

विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले आहेत, पण अद्याप अव्वल दोन स्थानांवर कुठले संघ असतील, हे निश्चित झालेले नाही. सध्याच्या फॉर्मचा विचार करता आॅस्ट्रेलिया द. आफ्रिकेचा पराभव करीत अव्वल स्थान पटकावेल, असे वाटते. त्यामुळे त्यांना भारताच्या तुलनेत एका गुणाची आघाडी घेता येईल. न्यूझीलंड इंग्लंडविरुद्ध पराभूत होईपर्यंत श्रीलंका शर्यतीत होता. श्रीलंकासुद्धा द. आफ्रिकाप्रमाणे विजयी शेवट करण्यास उत्सुक आहे.
श्रीलंकाला फलंदाजीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. संघ अडचणीत असताना गोलंदाजांनी त्यांना तारले आहे. श्रीलंकाच्या विजयांमध्ये लसिथ मलिंगाची गोलंदाजी उल्लेखनीय ठरली. त्यांच्या फलंदाजीत जयवर्धने-संगकारा किंवा जयसूर्या, कालूवितरना व दिलशान यांच्याप्रमाणे सातत्य नव्हते. कुशाल परेरा नक्कीच प्रतिभावान आहे, पण कुसाल मेंडिसच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. त्याचा श्रीलंकेला फटका बसला. अविष्का फर्नांडोने शतकी खेळी केली व भारताविरुद्ध त्याच्याकडून त्याच कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे.
भारताला मधल्या फळीची चिंता आहे. धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे चौथ्या क्रमांकावरील फलंदाज लोकेश राहुलला सलामीला खेळावे लागले. त्याचा भारतीय संघाच्या फलंदाजीवर परिणाम झाला. शंकर त्या स्थानावर स्थिर भासला नाही तर पंतने अद्याप अपेक्षित छाप सोडलेली नाही. पंतने ३०-४० धावांच्या खेळीचे मोठ्या खेळीमध्ये रुपांतर केले तर भारतीय संघाला प्रदीर्घ काळ चौथ्या स्थानाचा पेच पडणार नाही. पाचव्या व सहाव्या क्रमांकावरील स्थानही भारतासाठी डोकेदुखी ठरली आहे.

Web Title: ICC World Cup 2019: Rishabh Pantal has to make a big knock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.