ICC World Cup 2019 : जडेजाची सटकली; संजय मांजरेकरांवर सोडला शाब्दिक बाण

जडेजा हा कसोटी क्रिकेटमध्ये फक्त गोलंदाज आहे, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो फार महत्वाचा खेळाडू नाही, असे मांजरेकर म्हणाले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 11:39 PM2019-07-03T23:39:34+5:302019-07-03T23:41:05+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: ravindra jadeja slams Sanjay Manjrekar | ICC World Cup 2019 : जडेजाची सटकली; संजय मांजरेकरांवर सोडला शाब्दिक बाण

ICC World Cup 2019 : जडेजाची सटकली; संजय मांजरेकरांवर सोडला शाब्दिक बाण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समाचेलक मांजेकरांवर सडकून टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून जडेजाने मांजरेकर यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. पण जडेजाला मांजरेकरांवर एवढा भडकला तरी का, ते जाणून घेऊया....

भारताला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मांजरेकर यांनी लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यावर टीका केली होती. जडेजावर टीका करताना मांजरेकर म्हणाले होते की, " जडेजा हा कसोटी क्रिकेटमध्ये फक्त गोलंदाज आहे, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो फार महत्वाचा खेळाडू नाही."

मांजरेकर यांच्या टीकेला जडेजाने सडेतोड उत्तर दिले आहे. यावर जडेजा मांजरेकर यांना म्हणाला की, " मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलो आहे आणि मी अजूनही खेळत आहे. लोकांचा आदर करायला तुम्ही शिकायला हवे."



 

संजय मांजरेकरची कॉमेंट्री नको रे बाबा... नेटिझन्सने घेतला धसका
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय चाहत्यांना एक गोष्ट आवडली नाही आणी ती म्हणजे संजय मांजरेकरची कॉमेंट्री... वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान संजय मांजरेकरांच्या कॉमेंट्रीवर अनेकांनी नाराजी प्रकट केली आहे. सोशल मीडियावर तर मांजरेकरांवर सडकून टीका झाली. त्यात भर म्हणून मांजरेकरांनी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीवर टीका केली. त्यानंतर तर नेटिझन्सने मांजरेकरांचा चांगलाच समाचार घेतला. 

इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने आपली कामगिरी उंचावताना मंगळवारी बांगलादेशला नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. याही सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा संथ खेळ चर्चेचा विषय ठरला. भारतीय संघाच्या 315 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला 29 धावा कमी पडल्या. रोहित शर्माचा झेल सोडणं बांगलादेशला महागात पडले. रोहितनं 104 धावांची खेळी केली. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं भेदक गोलंदाजी करताना भारताला विजय मिळवून दिला.

Web Title: ICC World Cup 2019: ravindra jadeja slams Sanjay Manjrekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.