ICC World Cup 2019 : विश्वचषकातून बाहेर होऊनही पाकिस्तानचा संघ झाला कोट्यधीश...

विश्वचषकाच्या साखळी फेरीत पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 06:50 PM2019-07-08T18:50:57+5:302019-07-08T18:51:55+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Pakistan's team get 2.24 crore rupees from World Cup | ICC World Cup 2019 : विश्वचषकातून बाहेर होऊनही पाकिस्तानचा संघ झाला कोट्यधीश...

ICC World Cup 2019 : विश्वचषकातून बाहेर होऊनही पाकिस्तानचा संघ झाला कोट्यधीश...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानचा संघ विश्वचषकाच्या बाहेर पडला आहे. पण तरीही पाकिस्तानचा संघ कोट्याधीश झाल्याचे पुढे आले आहे. विश्वचषकाच्या साखळी फेरीत पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. पण तरीही पाकिस्तानवर आयसीसीने पैशांची बरसात केल्याचे पाहायला मिळाली आहे.

पाकिस्तानच्या संघाने या विश्वचषकात पाच सामने जिंकले. त्याचबरोबर एक सामना त्यांचा पावसामुळे रद्द झाला होता. त्यमुळे पाकिस्तानच्या खात्यात 11 गुण होते. विश्वचषकात न्यूझीलंडचेही 11 गुण आहेत. पण सरासरीच्या जोरावर न्यूझीलंडने उपांत्य फेरीत मजल मारली आहे.

विश्वचषकातून बाहेर पडल्यावरही पाकिस्तानला 2.24 कोटी रुपये मिळाले आहेत. कारण साखळी फेरीत बाहेर पडलेल्या संघांना प्रत्येकी 70 हजार रुपये देण्यात आले आहेत. प्रत्येक विजयासाठी संघाला 28 लाख रुपये देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सामना रद्द झाल्यावर संघाला प्रत्येकी 14 लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत पाकिस्तानला 2.24 कोटी रुपये मिळाले आहेत.

इंग्लंडमधील विश्वचषक आता अखेरच्या टप्प्यामध्ये आला आहे. आता तीन सामन्यांनंतर आपल्याला विश्वविजेता कोण हे समजू शकणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना मंगळवारी रंगणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो. पण यावेळी विश्वविजेत्या संघावर पैशांचा पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर अन्य संघही मालामाल होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी होणारा उपांत्य फेरीचा सामन्यावर पावसाचे सावट आहे. British MET departmentच्या माहितीनुसार सामन्यादरम्यान ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी पावसाची शक्यता 50 टक्के आहे आणि त्यामुळे सामना थोडा उशीरा सुरू होऊ शकतो. योगायोग म्हणजे साखळी फेरीत उभय संघांमधील सामना पावसामुळे रद्द झाला होता. हा सामना जर रद्द झाला तर भारतीय संघाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळू शकते.

जो संघ विश्वचषक जिंकेल त्यांना 28 कोटी रुपये मिळतील. उपविजेत्या संघाला 14 कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. उपांत्य फेरीत जे संघ पराभूत होतील, त्यांना प्रत्येकी 5.5 कोटी रुपये मिळणार आहेत.

Web Title: ICC World Cup 2019: Pakistan's team get 2.24 crore rupees from World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.