ICC World Cup 2019 : भारतीय खेळाडू लंडनला पोहोचले, पाहा व्हिडीओ

ICC World Cup 2019 : इंग्लंडमध्ये होत असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी लंडनमध्ये दाखल झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 09:52 AM2019-05-23T09:52:22+5:302019-05-23T09:52:42+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : Indian Team touchdown London for Cricket world cup 2019 | ICC World Cup 2019 : भारतीय खेळाडू लंडनला पोहोचले, पाहा व्हिडीओ

ICC World Cup 2019 : भारतीय खेळाडू लंडनला पोहोचले, पाहा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 :  इंग्लंडमध्ये होत असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी लंडनमध्ये दाखल झाला.  क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला 30 मेपासून सुरुवात होत असून, या स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. या विश्वचषक स्पर्धेतील सामने साखळी पद्धतीने खेळवण्यात येणार असल्याने  स्पर्धा अधिकच आव्हानात्मक बनली आहे. तसेच विजेतेपद मिळवण्यासाठी पहिल्या चेंडूपासून झुंज द्यावी लागणार आहे, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी व्यक्त केले होते.



इंग्लंडमध्ये होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेत 1992 नंतर प्रथमच राऊंड रॉबिन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रत्येक संघ एकमेकांशी खेळणार आहे. दरम्यान, भारतीय संघ 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या लढतीमधून स्पर्धेतील आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. त्यानंतर 9 जून रोजी होणाऱ्या लढतीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल, तर 13 जून रोजी भारताला न्यूझीलंडशी दोन हात करावे लागतील. त्यानंतर 16 जून रोजी होणाऱ्या लढतीत भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होईल. 
पाहा व्हिडीओ...

महेंद्रसिंग धोनीनं कुठल्या क्रमांकावर खेळावं? सचिन तेंडुलकरनं दिलं उत्तर
भारतीय संघ बुधवारी लंडनमध्ये दाखल झाला. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या सराव सामन्यात भारतीय संघ अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेचा संघ जाहीर झाल्यापासून किंवा तत्पूर्वी पासून चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याची चर्चा सुरू होती. अनेकांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला या क्रमांकावर खेळवावे असा प्रस्ताव मांडला, परंतु माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने धोनीनं कोणत्या क्रमांकावर खेळावे हा सल्ला दिला आहे.

धोनीबाबत तेंडुलकर म्हणाला,''मला विचाराल तर धोनीनं पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला यावे. फलंदाजीची क्रमवारी कशी असेल याबाबत मला माहीत नाही. रोहित आणि शिखर धवन सलामीला येणार असतील, तर कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. चौथ्या क्रमांकावर कोण खेळेल हे माहीत नाही, परंतु धोनी पाचव्या क्रमांकावर येईल. त्यानंतर हार्दिक पांड्या असेल. धोनीसारखा अनुभवी फलंदाज अखेरपर्यंत संघाचा धावफलक हलता ठेवेल आणि तो खेळपट्टीवर असताना पांड्या आक्रमक खेळी खेळेल.'' 
 

Web Title: ICC World Cup 2019 : Indian Team touchdown London for Cricket world cup 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.