ICC World Cup 2019: ... असा व्यायाम पाहून चाहत्यांनी उडवली हुर्यो, पाहा गमतीशीर व्हिडीओ

एका चाहत्याने तर, जेवण झाल्यावर वजन किती वाढले आहे, यासाठी हा व्यायामप्रकार असल्याचेही म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 06:06 PM2019-06-24T18:06:41+5:302019-06-24T18:08:10+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: ... fans fond of such exercise, watch funny videos | ICC World Cup 2019: ... असा व्यायाम पाहून चाहत्यांनी उडवली हुर्यो, पाहा गमतीशीर व्हिडीओ

ICC World Cup 2019: ... असा व्यायाम पाहून चाहत्यांनी उडवली हुर्यो, पाहा गमतीशीर व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडमध्ये सध्या विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकात प्रत्येक संघाला विजय मिळवायचा आहे. त्यामुळे प्रत्येक संघ कसून सराव करताना दिसत आहे. एका संघातील खेळाडू सामन्यापूर्वी एक व्यायामप्रकार करत होता. हा व्यायामप्रकार चाहत्यांना अजब वाटला आणि चाहत्यांनी त्यांची हुर्यो उडवली. या व्यायामाचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला असून चाहत्यांनी या खेळाडूंची चांगलीच खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले आहे.



 

आज बांगलादेश आणि अफागाणिस्तान यांच्यातील सामना सुरु आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वी बांगलादेशचे खेळाडू व्यायाम करत होते. यावर चाहत्यांनी काही कमेंट्स केल्या आहेत. या व्यायामासाठी रुममध्ये बकरी बांधा, असे एका चाहत्याने म्हटले आहे. एका चाहत्याने तर, जेवण झाल्यावर वजन किती वाढले आहे, यासाठी हा व्यायामप्रकार असल्याचेही म्हटले आहे.



 

भारत-पाकिस्तान पुन्हा येऊ शकतात आमनेसामने... जाणून घ्या कसे?
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट विश्व आतूर असते. हा सामना जर विश्वचषकातील असेल तर सर्वांचीच नजर या सामन्यावर असते. यंदाच्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने विजयी पंरपरा कायम ठेवली. पण आता भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ या विश्वचषकात पुन्हा एकदा आमने-सामने येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत एकमेकांसमोर येतील, असे म्हटले जात असून त्यामध्ये काही समीकरणेही आहेत.

सध्याच्या घडीला पाकिस्तानचे सहा सामने झाले आहेत. या सहा सामन्यांमध्ये पाकिस्तानचे पाच गुण आहेत. त्यामुळे यापुढे पाकिस्तानचे तीन सामने शिल्लक आहेत. हे तिन्ही सामने जर पाकिस्तानने जिंकले तर त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळवता येऊ शकते. पण त्याचबरोबर जर-तर या गोष्टीही यामध्ये पाहायला मिळत आहेत.

पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचण्याची पहिली शक्यता म्हणजे इंग्लंडचे आता तीन सामने शिल्लक आहेत. इंग्लंडचा संघ जर तिन्ही सामन्यांत पराभूत झाला, तर त्यांचे या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येईल. कारण सध्याच्या घडीला इंग्लंडचे सहा सामन्यांमध्ये आठ गुण आहेत. त्यामुळे जर यापुढील तिन्ही सामने इंग्लंडने गमावले तर त्यांना विश्वचषकातून बाहेर पडावे लागेल.

पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचण्याची दुसरी म्हणजे ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने गमावले तरही पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. कारण सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचा संघ 6 सामने खेळला आहे आणि त्यांचे 10 गुण आहेत. त्यामुळे जर ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने गमावले तर त्यांचे 10 गुण कायम राहतील. पण दुसरीकडे जर पाकिस्तानच्या संघाने तिन्ही सामने जिंकले तर त्यांचे 11 गुण होतील आणि ऑस्ट्रेलियाला मागे सारून पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवेल.

Web Title: ICC World Cup 2019: ... fans fond of such exercise, watch funny videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.