ICC World Cup 2019 : इंग्लंडने धु धु धुतले; विश्वचषकात उभारला धावांचा डोंगर

मॉर्गनने या सामन्यात फक्त 71 चेंडूंत 17 षटकार आणि चार चौकारांच्या जोरावर 148 धावांची दणकेबाज खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 07:36 PM2019-06-18T19:36:21+5:302019-06-18T19:37:07+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: England scored 397 runs against Afghanistan | ICC World Cup 2019 : इंग्लंडने धु धु धुतले; विश्वचषकात उभारला धावांचा डोंगर

ICC World Cup 2019 : इंग्लंडने धु धु धुतले; विश्वचषकात उभारला धावांचा डोंगर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC World Cup 2019, मँचेस्टर : इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. मॉर्गनने आपल्या 148 धावांच्या खेळीत तब्बल 102 धावा षटकारांच्या जोरावर उभारल्या. मॉर्गनच्या या खेळीच्या जोरावरच इंग्लंडला या सामन्यात 397 धावांचा डोंगर उभारता आला. मॉर्गनला जो रूट व जॉनी बेअरस्टोवची उत्तम साथ मिळाल्याचे पाहायला मिळाले.



 

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडला दहाव्या षटकात पहिला धक्का बसला. त्यानंतर जो रूट व जॉनी बेअरस्टोव यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. बेअरस्टोवने यावेळी 90 धावांची खेळी साकारली. बेअरस्टोव बाद झाला आणि त्यानंतर मैदानात मॉर्गन नावाचे तुफान आहे.



 

मॉर्गनने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढायला सुरुवात केली. या खेळीत मॉर्गनने तब्बल 17 षटकार लगावत 102 धावा फटकावल्या. मॉर्गनने यावेळी 17 षटकार लगावत नवा विक्रमही प्रस्थापित केला. कारण यापूर्वी 16 षटकारांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. मॉर्गनने या सामन्यात फक्त 71 चेंडूंत 17 षटकार आणि चार चौकारांच्या जोरावर 148 धावांची दणकेबाज खेळी साकारली.

धो... धो... धो डाला... क्रिकेट विश्वात हे प्रथमच घडले; विश्वचषकात रचला गेला 'हा' विक्रम
क्रिकेट विश्वात आतापर्यंत एक गोष्ट कधीही घडली नव्हती. ती गोष्ट आज घडली. कारण क्रिकेट विश्वात ही गोष्ट फक्त आजच घडलेली पाहायला मिळाली. आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषकाच्या सामन्यात ही गोष्ट घडली.
क्रिकेट विश्वातील एक मोठा विक्रम  इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने आपल्या नावावर केला आहे. आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना सुरु आहे. या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत मॉर्गनने तब्बल 148 धावा फटकावल्या. या फटकेबाजीबरोबर त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.



 

आतापर्यंत क्रिकेट विश्वामध्ये 17 षटकार कोणत्याही एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाले नव्हते. पण आज ही गोष्ट मॉर्गनच्या बॅटमधून पाहायला मिळाली. यापूर्वी 16 षटकारांचा विक्रम विश्वचषकामध्ये ख्रिस गेलच्या नावावर होता. हा विक्रम मॉर्गनने मोडीत काढला आहे.



 

Web Title: ICC World Cup 2019: England scored 397 runs against Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.