ICC World Cup 2019: डेव्हिड वॉर्नरने विश्वचषकात लिहीला इतिहास; रचले 'हे' विक्रम

वॉर्नरच्या झंझावाती खेळीपुढे बांगलादेशच्या गोलंदाजांना लोटांगण घालावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 08:44 PM2019-06-20T20:44:23+5:302019-06-20T20:46:22+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: David Warner has written history in the World Cup | ICC World Cup 2019: डेव्हिड वॉर्नरने विश्वचषकात लिहीला इतिहास; रचले 'हे' विक्रम

ICC World Cup 2019: डेव्हिड वॉर्नरने विश्वचषकात लिहीला इतिहास; रचले 'हे' विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बांगलादेशच्या गोलंदाजीचे डेव्हिड वॉर्नरने पिसे काढल्याचेच आज पाहायला मिळाले. वॉर्नरच्या झंझावाती खेळीपुढे बांगलादेशच्या गोलंदाजांना लोटांगण घालावे लागले. वॉर्नरच्या वादळापुढे बांगलादेशचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. वॉर्नरने या सामन्यात १६६ धावांची खेळी साकारत विश्वचषकात इतिहास रचला आहे. त्याचबरोबर वॉर्नरने काही विक्रमांनाही गवसणी घातली आहे.

वॉर्नरने या सामन्यात ११६ धावा केल्या, त्याचबरोबर विश्वचषकात दोनवेळा दीडशेपेक्षा धावा करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वॉर्नरने २०१५ साली झालेल्या विश्वचषकात अफगानिस्तानविरुद्धच्या सामन्यात १३३ चेंडूंमध्ये १७८ धावा केल्या होत्या.

वॉर्नरने यंदाच्या विश्वचषकात ११६ धावांची खेळी साकारली. ही आतापर्यंतची या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळी ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्याच आरोन फिंचच्या नावावर होता. फिंचने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात १५३ धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या जेसन रॉयनेही १५३ धावांची खेळी साकारली होती.

वॉर्नरचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील सोळावे शतक ठरले. वॉर्नरने ११० डावांमध्ये १६वे शतक साजरे करत भारताचा कर्णधार विराट कोहलीशी बरोबरी केली आहे. त्याचबरोबर शइखर धवन आणि जो रूट यांना पिछाडीवर टाकले आहे. पण या विक्रमाच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमलाच्या नावावर आहे. अमलाने ९४ डावामध्ये १६वे शतक साजरे केले होते.

ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतकांच्या यादीमध्ये वॉर्नर तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर वॉर्नरने अॅडन गिलख्रिस्टच्या शतकांची बरोबरी केली आहे. पण या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग पहिल्या स्थानावर आहे, तर दुसऱ्या स्थानावर माजी सलामीवीर मार्क वॉ आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी सुरुवातीपासून दमदार फलंदाजीचा नमुना पेश करत १२१ धावांची सलामी दिली. त्यानंतर फिंचच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. फिंचने ५१ चेंडूंत ५ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५३ धावा केल्या.

फिंच असताना आणि बाद झाल्यावरही वॉर्नरच्या फलंदाजीमध्ये कसलाच फरक जाणवला नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांवर वॉर्नर कायम तुटून पडत होता. वॉर्नरने यावेळी यंदाच्या विश्वचषकातील दुसरे शतक पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यावर वॉर्नरने बांगलादेशच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घायायला भाग पाडले. वॉर्नरने या सामन्यात फटक्यांचा धडाकाच लावला होता. वॉर्नरने १४७ चेंडूंत १४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर १६६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

वॉर्नरला यावेळी उस्मान ख्वाजानेही चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी रचली. ख्वाजाने या सामन्यात ७२ चेंडूंत १० चौकारांसह ८९ धावा केल्या.

वॉर्नर बाद झाल्यावर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी फटकेबाजीचा नमुना पेश केला. मॅक्सवेलने फक्त १० चेंडूंत २ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ३२ धावांची खेळी साकारली होती. बांगलादेशकडून सौम्य सरकारने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले.

Web Title: ICC World Cup 2019: David Warner has written history in the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.