ICC World Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीबाबत चेन्नई सुपर किंग्सचे मोठे विधान

धोनीच्या निवृत्तीबाबत आयपीएलमधील चेन्नई सुपर किग्सच्या अधिकाऱ्यांनी एक मोठे विधान केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 04:44 PM2019-07-13T16:44:46+5:302019-07-13T16:45:15+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Chennai Super Kings' major statement about MS Dhoni's retirement | ICC World Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीबाबत चेन्नई सुपर किंग्सचे मोठे विधान

ICC World Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीबाबत चेन्नई सुपर किंग्सचे मोठे विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा निवृत्ती जाहीर करेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण धोनीने मात्र तसे केलेले नाही. आता तर धोनीच्या निवृत्तीबाबत आयपीएलमधील चेन्नई सुपर किग्सच्या अधिकाऱ्यांनी एक मोठे विधान केले आहे.

मँचेस्टरमधील पराभवानंतर धोनी आपली निवृत्ती जाहीर करेल, असे काही जणांना वाटले होते, पण तसे मात्र घडताना दिसले नाही. पण धोनी आता निवृत्ती घेणारच नाही, असे मत चेन्नई सुपर किंग्सच्या एका अधिकाऱ्यांने व्यक्त केले आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकाऱ्याने सांगितले की, " धोनीच्या निवृत्तबात बरीच चर्चा सुरु आहे. पण धोनी सध्या तरी निवृत्ती घेणार नाही. कारण धोनी 2020 साली आयपीएल खेळणार असून तो चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्वही करणार आहे. त्यामुळे धोनी सध्याच्या घडीला तरी निवृत्ती घेणार नाही. "

महेंद्रसिंग धोनी निवृत्ती सध्या का घेत नाहीए, सांगतोय 'हा' महान कर्णधार
 धोनीने खरंच निवृत्ती घ्यावी का किंवा त्याने निवृत्तीचा निर्णय घेणं का अवघड जातंय, याबद्दल ऑस्ट्रेलियाचे महान कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 
वॉ म्हणाले की, " भारतामध्ये महान क्रिकेटपटूंना निवृत्तीचा निर्णय घेणे सोपे नसते. कारण भारतामध्ये महान क्रिकेटपटूला देवासारखे पुजले जाते. त्यामुळे एकदा आपली प्रतिमा देवासारखी झाली की त्यानंतर क्रिकेट सोडायचा निर्णय लवकर घेतला जात नाही. 140 कोटी लोकं भारतात आहेत, ज्यामधील बहुतांशी लोकं धोनीचे चाहते असतील. त्यामुळेच धोनीला हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. कारण जेव्हा तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा केल्या जातात तेव्हा निवृत्तीचा निर्णय घेणे, सोपे नसते."

भारत वर्ल्ड कपबाहेर पडल्यामुळे चाहते होतायत लखपती, पण कसे... जाणून घ्या
आता काही तासांवर वर्ल्ड कप फायनल येऊन ठेपली आहे. रविवारी दुपारी तीन वाजता वर्ल्ड कप फायनलला सुरुवात होणार आहे. यंदा वर्ल्ड कपमध्ये नवा विजेता पाहायला मिळणार आहे. कारण इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोघांनीही आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही. आता या नव्या विश्वविजेत्याला पाहायला चाहत्यांना स्टेडियममध्ये जायचे आहे, त्यासाठी एका तिकीटासाठी कितीही किंमत मोजायला ते तयार आहेत.
वर्ल्ड कपच्या फायनलची एक तिकीट आयसीसीने 295 पाऊंडला ठेवली होती, म्हणजेच  25408 रुपये एवढी त्याची किंमत होते. पण आता या तिकीटांचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्याच्या घडीला एका तिकीटाची किंमत 16 हजार पाउंड म्हणजे जवळपास 13.79 लाख रुपये एवढी आहे. त्यामुळे भारतीय चाहते अंतिम फेरीतील तिकीटं विकून लखपती होताना दिसत आहेत.

Web Title: ICC World Cup 2019: Chennai Super Kings' major statement about MS Dhoni's retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.