ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर ८६ धावांनी विजय 

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २४४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अवघ्या १५७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 06:46 AM2019-06-30T06:46:45+5:302019-06-30T06:50:54+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Australia thrash New Zealand by 86 runs | ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर ८६ धावांनी विजय 

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर ८६ धावांनी विजय 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ८६ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २४४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अवघ्या १५७ धावांपर्यंतच मजल मारु शकला. गोलंदाज मिशेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. 
न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसन (४० धावा) आणि रॉस टेलर (३० धावा) यांनी खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना जास्त वेळ खेळपट्टीवर तग धरू दिला नाही. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कने पाच बळी घेतले. तर, बेहरनडॉर्फने दोन, कमिन्स, लियॉन, स्मिथ यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतले. 

तत्पूर्वी, उस्मान ख्वाजा (८८) व अलेक्स कॅरी यांनी केलेल्या सयंमी फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोवर २४४ धावांचे आव्हान ठेवले. मात्र, न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात २४३ धावा केल्या. शेवटच्या षटकात बोल्टने हॅट्ट्रिक करत सनसनाटी निर्माण केली. या स्पर्धेतील ही दुसरी हॅट्ट्रिक ठरली. भारताच्या शमीने अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवली आहे. बोल्टने ४, तर निशाम आणि फर्ग्युसन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.


ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बोल्टने अ‍ॅरॉन फिंच (८) याला बाद करत पहिला धक्का दिला. या विश्वचषक स्पर्धेत धावांचे सातत्य राखलेल्या वॉर्नरलाही काही करता आले नाही. त्याला फर्ग्युसनने १६ धावांत बाद केले. त्यानंतर आलेल्या स्मिथला (५) बाद करत फर्ग्युसनने ऑस्ट्रेलियन फलंदाजीला खिंडार पाडले. एका बाजूने पडझड होत असताना दुसऱ्या बाजूने उस्मान ख्वाजा मात्र सयंमाने फलंदाजी करत होता. स्टोनीसने त्याला थोडी साथ दिली. मात्र, तोही मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. मॅक्सवेलला शून्यात बाद करत निशामने ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद ९२ अशी केली.

या अवस्थेतून कॅरी व ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला बाहेर काढले. कॅरीने ७२ चेंडूत ११ चौकारासह ७१ धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. कॅरीने आक्रमक पावित्रा घेतल्यामुळे ख्वाजा सयंमाने एक बाजू लढवत होता. विल्यम्सनने कॅरीला बाद करत ही जोडी फोडली. पहिल्या सत्रात झटपट बळी घेतलेल्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांना ख्वाजाने मात्र चांगलेच तोंड दिले. कॅरी बाद झाल्यानंतर ख्वाजाने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याला कमिन्सने नाबाद २३ धावा करत चांगली साथ दिली. शेवटच्या षटकात बोल्टने ख्वाजा (८८), स्टार्क (०) व बेहरनडॉर्फ (०) यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत हॅट्ट्रिक नोंदवली.

Web Title: ICC World Cup 2019: Australia thrash New Zealand by 86 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.