ICC World Cup 2019 : पाकिस्तानचे 'Mission Impossible'; हे आहेत वन डेतील मोठ्या फरकाने मिळवलेले विजय 

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आल्यात जमा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 04:28 PM2019-07-05T16:28:03+5:302019-07-05T16:28:37+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : Ahead of Pakistan's mission impossible, here's a look at highest margin of victories in ODIs | ICC World Cup 2019 : पाकिस्तानचे 'Mission Impossible'; हे आहेत वन डेतील मोठ्या फरकाने मिळवलेले विजय 

ICC World Cup 2019 : पाकिस्तानचे 'Mission Impossible'; हे आहेत वन डेतील मोठ्या फरकाने मिळवलेले विजय 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आल्यात जमा आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्यांना प्रथम फलंदाजी करून 400, 500 किंवा 600 धावा कराव्या लागणार आहेत आणि 316 धावांच्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. नाणेफेकीच्या कौल बाजूने लागूनही त्यांना 20 षटकात शंभरचा पल्लाही ओलांडता आलेला नाही. पाकिस्तानने आज मोठ्या फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केल्यास वन डे क्रिकेटमधील तो सर्वात मोठा विजय ठरणार आहे. 

पाकिस्तानलाही अशाच चमत्काराची गरज आहे.
पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली तर त्यांना 50 षटकांत किमान 350 धावा कराव्या लागतील. तसेच 350 धावा केल्यानंतर बांगलादेशला 39 धावांत गुंडाळावे लागेल. म्हणजेच 311 धावांनी विजय मिळवला लागेल.

दुसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना 50 षटकांमध्ये 400 धावा कराव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 84 धावांनी गुंडाळून 316 धावांनी विजय मिळवावा लागेल. असा विजय मिळवला तरच पाकिस्तानचा रनरेट हा न्यूझीलंडपेक्षा अधिक होईल आणि पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता येईल. 

तिसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 450 धावा फटकवाव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 129 धावांवर गुंडाळावे लागेल. म्हणजेच 321 धावांनी विजय मिळवल्यास पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. 

Web Title: ICC World Cup 2019 : Ahead of Pakistan's mission impossible, here's a look at highest margin of victories in ODIs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.