‘#मीटू’ बाबत आयसीसी कठोर; अधिकाऱ्यांवर आजीवन बंदीची शक्यता

नवी दिल्ली : महिलांच्या लैंगिक शोषणाची गंभीर दखल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घेतली. आगामी महिला टी२० विश्वचषकापूर्वी ‘महिला सुरक्षेसंदर्भात दिशानिर्देश’ ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 06:06 AM2018-10-18T06:06:45+5:302018-10-18T06:06:47+5:30

whatsapp join usJoin us
ICC hard about '#metoo'; The possibility of lifelong ban on the officers | ‘#मीटू’ बाबत आयसीसी कठोर; अधिकाऱ्यांवर आजीवन बंदीची शक्यता

‘#मीटू’ बाबत आयसीसी कठोर; अधिकाऱ्यांवर आजीवन बंदीची शक्यता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : महिलांच्या लैंगिक शोषणाची गंभीर दखल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घेतली. आगामी महिला टी२० विश्वचषकापूर्वी ‘महिला सुरक्षेसंदर्भात दिशानिर्देश’ असलेले ठोस धोरण आखण्याचा आयसीसीने निर्णय घेतल्याची चर्चा आहे.


‘# मी टू’ मोहिमेत क्रिकेटपटू व अधिकार्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले. बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यावर एका अज्ञात महिलेने तसेच श्रीलंकेचा क्रिकेटपटू लसिथ मलिंगावर आयपीएलदरम्यान एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला. यावर आयसीसीने कठोर उपाययोजना करण्याचे ठरविले. ९ नोव्हेंबरपासून विंडीजमध्ये सुरु होणाºया महिला विश्वचषकापूर्वी आयसीसीला याविषयी कठोर धोरण लागू करायचे आहे. संगापूर येथे बुधवारी आमसभेत यावर सविस्तर चर्चा होईल. गेल्या १८ महिन्यात झालेल्या आयसीसी स्पर्धा, आंतरराष्टÑीय सामने व द्विपक्षीय मालिकादरम्यान कथित अत्याचार तसेच महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची काही प्रकरणे घडल्याने कठोर धोरण लागू करण्याची आयसीसीला घाई झाली आहे.
बैठकीत एक प्रस्ताव ठेवला जाईल. त्यात खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी, क्रीडा पत्रकार व जाहिरात एजेन्सीतील अधिकारी हे लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्याची शिफारस असेल. (वृत्तसंस्था)

Web Title: ICC hard about '#metoo'; The possibility of lifelong ban on the officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.