मी संघ व्यवस्थापनाकडे विश्रांतीची मागणी केली होती : पांड्या

मी संघ व्यवस्थापनाकडे विश्रांतीची मागणी केली होती, असे भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने स्पष्ट केले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:47 AM2017-11-14T00:47:04+5:302017-11-14T00:48:01+5:30

whatsapp join usJoin us
 I had asked for rest to the team management: Pandya | मी संघ व्यवस्थापनाकडे विश्रांतीची मागणी केली होती : पांड्या

मी संघ व्यवस्थापनाकडे विश्रांतीची मागणी केली होती : पांड्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : मी संघ व्यवस्थापनाकडे विश्रांतीची मागणी केली होती, असे भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने स्पष्ट केले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे.
पूर्णपणे फिट वाटत नसल्यामुळे मी विश्रांती देण्याची विनंती केली होती. पांड्याचा सुरुवातीला संघात समावेश करण्यात आला होता, पण त्यानंतर त्याला विश्रांती देण्यात आली. बीसीसीआयने मात्र पांड्याला विश्रांती देण्याचे कारण स्पष्ट केले नव्हते.
पांड्या म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी विश्रांतीची मागणी केली होती. माझे शरीर सामन्यासाठी तयार नव्हते. व्यस्त कार्यक्रमामुळे मला दुखापत झाली होती. पूर्णपणे फिट असेल तर खेळणे योग्य. मला विश्रांती मिळाल्यामुळे स्वत:ला नशिबवान समजतो. ब्रेकदरम्यान जिममध्ये ट्रेनिंग करणार असून फिटनेसमध्ये सुधारणा करण्यावर भर राहील. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेबाबत उत्सुक आहे.’ पांड्या फिटनेस मिळवण्यासाठी एमसीएमध्ये जाणार आहे. माझी अष्टपैलू क्षमता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संघासाठी फरक स्पष्ट करणारी ठरेल, अशी आशा पांड्याने या वेळी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)

Web Title:  I had asked for rest to the team management: Pandya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.