हैदराबाद-कोलकाता आज भिडणार

दुसरी क्वालिफायर लढत : अंतिम फेरी गाठण्यासाठी रोमांचक सामना रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:34 AM2018-05-25T00:34:24+5:302018-05-25T00:34:24+5:30

whatsapp join usJoin us
Hyderabad-Kolkata will clash today | हैदराबाद-कोलकाता आज भिडणार

हैदराबाद-कोलकाता आज भिडणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : दोनवेळा जेतेपदाचा मान मिळवणारा कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघ शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगमधील दुसºया क्वालिफायर लढतीत सनरायझर्स हैदराबादचे आव्हान पेलण्यास सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, सनरायझर्सची गेल्या काही लढतीतील निराशाजनक कामगिरीचा लाभ घेण्यास केकेआर प्रयत्नशील आहे.
केकेआर संघ गेल्या चार लढतीत चारही सामने जिंकत फॉर्मात आहे, तर लीग फेरीत अव्वल स्थानावर असलेल्या सनरायझर्स संघाला गेल्या काही सामन्यांतमध्ये संघर्ष करावा लागला आहे.
मोक्याच्यावेळी कच खाणे आणि मधल्या फळीतील निराशाजनक कामगिरीमुळे सनरायझर्सला सलग चार सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील संघासाठी हा चिंतेचा विषय आहे.
भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा आणि राशिद खान यांच्या उपस्थितीत सनरायझर्सची गोलंदाजीची बाजू यंदाच्या मोसमात कदाचित सर्वांत मजबूत आहे. हे गोलंदाज शुक्रवारी ईडन गार्डनच्या खेळपट्टीकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहतील.
दुसरीकडे, दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील केकेआर संघ फॉर्मात असून ते घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ घेण्यास प्रयत्नशील असतील. विलियम्सनच्या नेतृत्वाखालील संघाला केकेआरची घोडदौड रोखण्यासाठी कामगिरीत मोठी सुधारणा करावी लागेल.
सनरायझर्स हैदराबाद संघाची भिस्त कर्णधार विलियम्सनच्या कामगिरीवर अवलंबून आहे. त्याने आतापर्यंत ५७.०५ च्या सरासरीने ६८५ धावा फटकावलेल्या आहेत. सीएसकेविरुद्ध पहिल्या क्वालिफायरमध्ये एकवेळ सनरायझर्स संघ मजबूत स्थितीत होता. संघाने प्रतिस्पर्धी सीएसकेचे ८ बळी घेतले होते, पण १८ व्या षटकात कार्लोस ब्रेथवेटला गोलंदाजी देण्याची निर्णय महागडा ठरला. (वृत्तसंस्था)

प्रतिस्पर्धी संघ
सनरायझर्स हैदराबाद : केन विलियम्सन (कर्णधार), शिखर धवन, मनिष पांडे, भुवनेश्वर कुमार, रिद्धिमान साहा, सिद्धार्थ कौल, दीपक हुडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसुफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बसिल थम्पी, टी. नटराजन, सचिन बेबी, बिपुल शर्मा, मेहदी हसन, तन्मय अगरवाल, अ‍ॅलेक्स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, राशिद खान, शाकिब अल हसन, मोहम्मद नाबी आणि ख्रिस जॉर्डन.
कोलकाता नाइट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), सुनिल नेरेन, आंद्रे रसेल, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, कुलदीप यादव, पियूष चावला, नितिश राणा, प्रसिद्ध क्रिष्णा, शिवम मावी, मिचेल जॉन्सन, शुभमान गिल, आर. विनय कुमार, रिंकू सिंग, कॅमेरुन डेलपोर्ट, जेवॉन सीर्लेस, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी आणि टॉम कुर्रन.

उभय संघांनी राऊंड रॉबिनमध्ये एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक-एक विजय मिळवला. केकेआरला गृहमैदानावर पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर त्यांनी हैदाराबादमध्ये विजय मिळवला होता. या सामन्यातील विजेता संघ २७ मे रोजी मुंबईत अंतिम लढतीत चेन्नईविरुद्ध खेळेल.

Web Title: Hyderabad-Kolkata will clash today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.