धोनीच्या शिस्तीचा नाद करायचा नाय; सरावाला उशिरा पोहोचल्यास होती 'डेंजर' शिक्षा

भारतीय संघाच्या सरावाला उशीला आल्यावर धोनी खेळाडूंना कोणती शिक्षा द्यायचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 11:22 AM2019-05-15T11:22:27+5:302019-05-15T11:22:49+5:30

whatsapp join usJoin us
How MS Dhoni came up with unique punishment to prevent Indian players from coming late to practice | धोनीच्या शिस्तीचा नाद करायचा नाय; सरावाला उशिरा पोहोचल्यास होती 'डेंजर' शिक्षा

धोनीच्या शिस्तीचा नाद करायचा नाय; सरावाला उशिरा पोहोचल्यास होती 'डेंजर' शिक्षा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतीय संघाचे माजी मानसिक स्वास्थ्य प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी त्यांच्या पुस्तकात भारतीय संघाबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 'Barefoot' या पुस्तकातून त्यांनी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरबाबात विविदास्पद माहिती दिली आहे. पण, याच पुस्तकात त्यानी माजी कर्णधार महेंद्रसिंग दोनीचे गोडवे गायले आहे. भारतीय संघाच्या सरावाला उशीला आल्यावर धोनी खेळाडूंना कोणती शिक्षा द्यायचा, याचा गमतीदार किस्सा अप्टन यांनी सांगितला आहे.


धोनी हा जगातील सर्वात चतुर कर्णधार आहे, यात तिळमात्र शंका नाही. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) महत्त्वांच्या स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. रांचीत जन्मलेल्या धोनीचा 2019चा वर्ल्ड कप हा अखेरचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावण्याचा त्याचा निर्धार असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने दाखल होणार आहे. अप्टन यांनी लिहिले की,''एकाग्रता आणि शांतता ही धोनीची ताकद आहे. सामन्याची परिस्थिती तो अचुक जाणतो. कठीण प्रसंगीही शांत राहून संघाला मार्गदर्शन करणे, या गुणामुळे तो सर्वोत्तम कर्णधार ठरतो. त्याच्या या कृतीमुळे अन्य खेळाडूंचेही लक्ष्य विचलित होत नाही.'' 


अप्टन यांनी धोनीच्या एका शिक्षेचाही उल्लेख केला आहे. ''मी भारतीय संघाचा सदस्य झालो त्यावेळी अनिल कुंबळे हा कसोटी संघाचा, तर धोनी वन डे संघाचा कर्णधार होता. त्यावेळी सराव सत्रात आम्ही सर्व खेळाडूंना वेळेवर येण्याची शिस्त लावली होती. त्यात कोणी अपयशी ठरल्यास त्याला शिक्षाही देण्यात येत होती. कुंबळेने उशीरा येणाऱ्या खेळाडूला 10000 हजाराचा दंड भरण्याच्या शिक्षेचा पर्याय सूचवला होता. त्याने याबाबत धोनीलाही विचारले. धोनीनं त्यात ट्विस्ट आणला. त्याने उशीरा येणाऱ्या खेळाडूंसह सर्वच खेळाडूंकडून 10000 दंड वसूल करण्याची शिक्षा सुनावली. त्यानंतर सराव सत्रात कोणीही उशीरा आलेले नाही,'' असे अप्टन यांनी लिहिले आहे. 

Web Title: How MS Dhoni came up with unique punishment to prevent Indian players from coming late to practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.