भारताला विजयी वाटेवर परतण्याची आशा, आज इंग्लंडविरुद्ध लढत

पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झालेला भारतीय महिला संघ टी-२० तिरंगी मालिकेच्या सामन्यात रविवारी इंग्लंडविरुद्ध विजयी पथावर परतण्याच्या इराद्याने खेळणार आहे. सहा गड्यांनी पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारताला तिन्ही विभागात प्रभावी कामगिरी करण्याचे आव्हान असेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 05:28 AM2018-03-25T05:28:09+5:302018-03-25T05:28:09+5:30

whatsapp join usJoin us
 Hope to return to India on a winning path, today we are fighting against England | भारताला विजयी वाटेवर परतण्याची आशा, आज इंग्लंडविरुद्ध लढत

भारताला विजयी वाटेवर परतण्याची आशा, आज इंग्लंडविरुद्ध लढत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झालेला भारतीय महिला संघ टी-२० तिरंगी मालिकेच्या सामन्यात रविवारी इंग्लंडविरुद्ध विजयी पथावर परतण्याच्या इराद्याने खेळणार आहे. सहा गड्यांनी पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारताला तिन्ही विभागात प्रभावी कामगिरी करण्याचे आव्हान असेल.
भारताच्या मधल्या आणि तळाच्या फळीतील फलंदाजांना धावा काढण्यात अपयश आले. वेदा कृष्णमूर्ती, हरमनप्रीत आणि मिताली राज या त्रिकूटाला धावा काढाव्याच लागतील.
उपकर्णधार स्मृती मानधना हिने ६७ धावांची खेळी केली पण बेजबाबदारपणे ती बाद झाली. गोलंदाजीत अनुभवी झुलन गोस्वामी हिने प्रतिस्पर्धी फलंदाजांमध्ये धडकी भरविली होती पण शिखा पांडे आणि रुमेली धर यांची तिला साथ लाभली नाही. फिरकीपटू पुनम यादव आणि दीप्ती शर्मा यांच्याकडूनही उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे.
इंग्लंडने फलंदाजीत अप्रतिम कामगिरीच्या बळावर काल आॅस्ट्रेलियाचा आठ गड्यांनी सहज पराभव केला होता. कामगिरीत सातत्य राखण्यास हा संघ उत्सुक असेल.
आयसीसी चॅम्पियनशीपच्या आॅस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत भारताला ३ -०असा पराभव पराभव पत्करावा लागला.
त्यानंतर तिरंगी मालिकेतील पहिल्याच सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारतावर मोठा विजय मिळवला. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणे भारतासाठी मोठे आव्हान आहे. भारतीय संघ या आधीच्या चार सामन्यात चांगल्या सुरूवातीचा लाभ घेऊ शकला नाही.
त्यामुळेच संघाला पराभवाचे तोंड बघावे लागले आहे.
या सामन्यात भारताची मधली फळी काय करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. मधली फळी सातत्याने अपयशी ठरत आहे. (वृत्तसंस्था)

प्रतिस्पर्धी संघ :
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, मिताली राज, वेदा कृष्णामूर्ती, झेमिमा रॉड्रिग्ज, अनुजा पाटील, दीप्ती शर्मा, तान्या भाटिया, पुनम यादव, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, रुमेली धर, मोना मेश्राम, राधा यादव.
इंग्लंड : हीथर नाईट (कर्णधार), तमसिन ब्यूमोंट, केट क्रॉस, एलिस डेव्हिडसन रिचर्ड्स, सोफी एस्सेलेस्टोन,टॅश फारांट, केटी जॉर्ज, जेनी गन अ‍ॅलेक्स हार्टले, डॅनियेले हॉजेल, एमी जोन्स, आन्या श्रुबसोले, नेटली स्किवेर, फ्रान विल्सन, डॉनी वाट.

‘‘मागच्या दोन महिन्यांपासून सलग खेळत असूनही आमच्या संघात कुणीही खेळाडू थकलेला नाही.अशी संधी संघाला अनेक वर्षानंतर मिळाली आहे. बीसीसीआयकडून अशीच अपेक्षा होती. आम्ही सलग खेळण्याचा अनुभव घेत आहोत. सतत क्रिकेट खेळल्यामुळे कधी मुसंडी मारायची याची आपल्याला जाणिव असते.’’
-हरमनप्रीत कौर, कर्णधार

Web Title:  Hope to return to India on a winning path, today we are fighting against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.