‘खडूस’ क्रिकेटपटूंचा ऐतिहासिक क्षण

गुरुवारपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू झालेला बडोद्याविरुद्धचा सामना मुंबई संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक आहे. या लढतीद्वारे मुंबई रणजी स्पर्धेतील आपला ५००वा विक्रमी सामना खेळत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 03:15 AM2017-11-10T03:15:21+5:302017-11-10T03:15:26+5:30

whatsapp join usJoin us
Historical moment of 'Khadus' cricketer | ‘खडूस’ क्रिकेटपटूंचा ऐतिहासिक क्षण

‘खडूस’ क्रिकेटपटूंचा ऐतिहासिक क्षण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गुरुवारपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू झालेला बडोद्याविरुद्धचा सामना मुंबई संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक आहे. या लढतीद्वारे मुंबई रणजी स्पर्धेतील आपला ५००वा विक्रमी सामना खेळत आहे. विक्रमी यासाठी, कारण यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही संघाने केलेली नाही. रणजी स्पर्धा इतिहासात मुंबईने सर्वाधिक सामने जिंकतानाच सर्वाधिक ४१ वेळा रणजी ट्रॉफी पटकावली आहे.
एकूण ४६ वेळा अंतिम फेरी गाठलेल्या मुंबईला केवळ ५ वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळेच या स्पर्धेत
शेकडो रेकॉर्ड मुंबईच्या नावावर आहेत. मुंबईचे तब्बल ७० क्रिकेटपटू भारतासाठी खेळलेले आहेत. त्यातील अनेक खेळाडूंनी देशाचे नेतृत्वही केले. वेगवान, फिरकी गोलंदाजांसह अष्टपैलू खेळाडू मुंबईने दिले आहेत आणि खासकरून मुंबईची
कायम एक ओळख आणि ताकद असलेले शानदार फलंदाज देशाला लाभले आहेत. विजय मर्चंटपासून सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर ते आत्ताचा पृथ्वी शॉ.. असे सगळे स्टार ‘मुंबई शाळा’मधून आले आहेत. या ऐतिहासिक दिनानिमित्त बुधवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने एक शानदार कार्यक्रमही झाला.
या वेळी मुंबईचे कर्णधारपद भूषविलेल्या सर्व खेळाडूंना सन्मानितही करण्यात आले. पण, माझ्या मते याहूनही दिमाखदार सोहळा एमसीएला करता आला असता. या सोहळ्याची चांगल्या प्रकारे आखणी केली असती, तर कदाचित सर्व मुंबईकर खेळाडू या क्षणाचे साक्षीदार झाले असते. कारण, या सोहळ्यासाठी सुनील गावसकर, संदीप पाटील, रवी शास्त्री यासारखे दिग्गज अनुपस्थित होते. त्यामुळेच या कार्यक्रमात खूप कमतरता असल्याचे भासत होते. कारण, ५००वा सामना खेळला जाणार हे माहीत असताना, जर का नीट विचार करून आखणी केली असती, तर ही कमतरता नक्कीच भरून काढता आली असती, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर, दिलीप वेंगसरकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अजित वाडेकर, माधव आपटे यासारखे दिग्गज या सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे असे नाही, की या कार्यक्रमाला रंगत नव्हती. सर्वांनीच आपापले अनुभव सांगताना काही अप्रतिम आठवणी जागवल्या. खासकरून मुंबईची विशेषता असलेल्या ‘खडूस’ वृत्तीबाबत आठवणी सर्वांनी सांगितल्या. त्यामुळे एक गोष्ट खूप पटली, की ज्यांना कोणाला मुंबईकडून खेळायचे आहे, त्यांना मनाने आणि डोक्याने खूप मजबूत असावे लागते.
पण, असे असले तरी क्रिकेट हा अनिश्चततेचा खेळ आहे. त्यामुळेच मुंबईचा सामना पाहायला आलेल्यांना आणि खासकरून
युवा पृथ्वी शॉची फलंदाजी पाहायला आलेल्यांचा हिरमोडही झाला. गुरुवारीच वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या पृृथ्वीला पाचव्याच चेंडूवर शून्यावर बाद व्हावे लागले. या मोसमात त्याने खो-याने धावा काढल्या आहेत; पण बडोद्याविरुद्ध तो अपयशी ठरला. त्यानंतर लगेच रहाणेही शून्यावर बाद झाला. त्यामुळे क्रिकेटमध्ये हीरोला झीरो बनायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे हा खेळ खूप महान आहे.

अयाझ मेमन
संपादकीय सल्लागार

Web Title: Historical moment of 'Khadus' cricketer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.