#HappyBirthdayRahulDravid: Dravid cried out and ran away after seeing that '20 year girl | #HappyBirthdayRahulDravid : 'त्या' २० वर्षांच्या तरूणीचे प्रताप पाहून द्रविड ओरडला आणि पळत सुटला
#HappyBirthdayRahulDravid : 'त्या' २० वर्षांच्या तरूणीचे प्रताप पाहून द्रविड ओरडला आणि पळत सुटला

ठळक मुद्दे त्या एका रुममध्ये द्रविड आणि ती सुंदर तरुणी होती.हा सारा प्रकार पाहून द्रविड घाबरला.त्याने जोरात आरडा-ओरडा करत त्या रुममधून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : 'द वॉल' ही बिरुदावली सार्थ ठरवणाऱ्या राहुल द्रविडचा आज ४६वा वाढदिवस आहे. त्याच्या या वाढदिवसानिमित्त बऱ्याच न ऐकलेल्या गोष्टीही वाचायला मिळत आहेत. त्या गोष्टींपैकी अशीच एक न वाचलेली किंवा ऐकलेली ही घटना.

काही वर्षांपूर्वी  'MTV बकरा' हा शो फार प्रसिद्ध होता. या कार्यक्रमामध्ये सेलिब्रेटींना विनोदी प्रश्न विचारले जायचे. या कार्यक्रमामध्ये एकदा द्रविडची मुलाखत घेण्याचे ठरले. त्यावेळी एका सुंदर तरुणीला द्रविडची मुलाखत घेण्यासाठी पाठवण्यात आले होते.द्रविडने या मुलाखतीमध्ये सुंदर उत्तर दिली. मुलाखत संपली. त्यानंतर कॅमेरा बंद झाला. त्या एका रुममध्ये द्रविड आणि ती सुंदर तरुणी होती. त्यावेळी त्या तरुणीने द्रविडला विचारले, 'मी तुमची चाहती आहे, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का...' फक्त हे विचारून ती तरूणी थांबली नाही, तर त्या तरुणीने आपले दोन्ही हात द्रविडच्या पायावर ठेवले. हा सारा प्रकार पाहून द्रविड घाबरला. त्याला घाम फुटला. त्याने जोरात आरडा-ओरडा करत त्या रुममधून पळ काढण्याचा प्रयत्न केला.


 


द्रविड त्या रुममधून पळणार, इतक्यात एक व्यक्ती आतमध्ये आली. त्या व्यक्तीने द्रविडला सांगितले की, ही एक मस्करी होती. या प्रकाराला गंभीरपणे घेऊ नका. द्रविडलाही ही गोष्ट समजल्यावर हसू आवरता आले नाही.


Web Title: #HappyBirthdayRahulDravid: Dravid cried out and ran away after seeing that '20 year girl
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.