क्रिकेटच्या डॉनला गुगलची मानवंदना 

Google Doodle: 99.94 अशी जबरदस्त सरासरी आणि अवघ्या 52 कसोटी सामन्यांत 29 शतके, एका दिवसात त्रिशतक असे फलंदाजीतले अनेक विक्रम करणारे सर डॉन ब्रॅडमन यांचा आज 110 वा जन्मदिन.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 08:33 AM2018-08-27T08:33:50+5:302018-08-27T11:56:29+5:30

whatsapp join usJoin us
Google tribute to cricket's don | क्रिकेटच्या डॉनला गुगलची मानवंदना 

क्रिकेटच्या डॉनला गुगलची मानवंदना 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - 99.94 अशी जबरदस्त सरासरी आणि अवघ्या 52 कसोटी सामन्यांत 29 शतके, एका दिवसात त्रिशतक असे फलंदाजीतले अनेक विक्रम करणारे सर डॉन ब्रॅडमन यांचा आज 110 वा जन्मदिन. क्रिकेटमधील फलंदाजांचे डॉन असलेल्या ब्रॅडमन यांना गुगलने मानवंदना दिली आहे. आज गुगलच्या डुडलवर ब्रॅडमन झळकले आहेत. 

27 ऑगस्ट 1908 रोजी ऑस्ट्रेलियातील कुंटमुद्रा येथे जन्मलेल्या डॉन ब्रॅडमन यांनी क्रिकेटच्या मैदानात अजेक विक्रम प्रस्थापित केले. 1928 ते 1948 या काळात एकूण 52 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना ब्रॅडमन यांनी 99.94 च्या सरासरीने एकूण 6 हजार 996 धावा फटकावल्या. त्यामध्ये 29 शतकांचा समावेश होता. 1931 च्या अॅशेस मालिकेत ब्रॅडमन यांनी 974 धावा फटकावल्या होत्या. हा विक्रम अद्याप अबाधित आहे. तसेच एका दिवसात त्रिशतक फटकावणारे ब्रॅडमन हे एकमेव फलंदाज आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये 99.96 च्या सरासरीने धावा फटकावण्याच्या त्यांच्या विक्रमाचा आसपासही कुठला फलंदाज फिरकू शकलेला नाही. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके फटकावणारे ते पहिले फलंदाज होते. त्यांच्या या विक्रमाशी नंतर ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांनी बरोबरी केली होती. 



 

Web Title: Google tribute to cricket's don

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.