सुरेश रैनावर बरसला गांगुली, म्हणाला भारतात त्यापेक्षा चांगले खेळाडू आहेत 

इंग्लंडमधील वन डे मालिका पराभवावर नाखुश झालेल्या माजी कर्णधार सौरव गांगुलीने डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला धारेवर धरले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 01:20 PM2018-07-18T13:20:39+5:302018-07-18T13:21:12+5:30

whatsapp join usJoin us
Ganguly fire on suresh raina, said that there are better players in India | सुरेश रैनावर बरसला गांगुली, म्हणाला भारतात त्यापेक्षा चांगले खेळाडू आहेत 

सुरेश रैनावर बरसला गांगुली, म्हणाला भारतात त्यापेक्षा चांगले खेळाडू आहेत 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देरैनाने इंग्लंड दौ-यावरील दोन सामन्यांत मिळून 23.50 च्या सरासरीने केवळ 47 धावा केल्या आहेत, तर एका टी-20 मध्ये 27 धावा केल्या आहेत.

मुंबई - मधल्या फळीचे अपयश ही भारतीय संघासाठी पुन्हा एकदा डोकेदुखी ठरत आहे. इंग्लंड दौ-यावरही त्याची प्रचिती आली. इंग्लंडने 2-1 अशा फरकाने बाजी मारताना भारताची वन डे मालिकांची विजयी मालिका खंडित केली. या पराभवात मधल्या फळीतील फलंदांचे अपयश हे प्रमुख कारण ठरले आहे. या मालिका पराभवावर नाखुश झालेल्या माजी कर्णधार सौरव गांगुलीने डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला धारेवर धरले. 
रैनाने इंग्लंड दौ-यावरील दोन सामन्यांत मिळून 23.50 च्या सरासरीने केवळ 47 धावा केल्या आहेत, तर एका टी-20 मध्ये 27 धावा केल्या आहेत. तो म्हणाला, सुरेश रैनापेक्षा चांगले खेळाडू भारतात आहेत. त्याला एवढी संधी का दिली जात आहे ?
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही खेळाडूंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने संघाला मेहनत घ्यावी लागेल असेही तो म्हणाला. त्यावर गांगुलीने मत व्यक्त केले की, विश्वचषक स्पर्धेपर्यंत भारत 15 वन डे सामने खेळणार आहे. त्यामुळे संघबांधणीसाठी प्रत्येक सामना महत्वाचा आहे. मधल्या फळीतील समस्या सोडवण्यासाठी लोकेश राहुलला चौथ्या स्थानावर खेळवा. पुढील 15 सामने त्याला याच क्रमावर खेळण्याची संधी द्या, तरच तुम्हाला चांगला खेळाडू मिळेल. एक-दोन सामन्यांनंतर त्याला बसवत राहिलात तर मधल्या फळीची समस्या सोडवू शकणार नाही. 

Web Title: Ganguly fire on suresh raina, said that there are better players in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.