गेमप्लॅन - आॅस्ट्रेलियापुढे भारताला रोखण्याचे आव्हान

आॅस्ट्रेलियापुढे तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताला रोखण्याचे आव्हान आहे. क्रिकेटचे स्वरूप छोटे झाले तर उभय संघांदरम्यानचा फरक काही प्रमाणात कमी होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 04:01 AM2017-10-07T04:01:57+5:302017-10-07T04:02:27+5:30

whatsapp join usJoin us
Gameplan - A challenge to stop India from Australia | गेमप्लॅन - आॅस्ट्रेलियापुढे भारताला रोखण्याचे आव्हान

गेमप्लॅन - आॅस्ट्रेलियापुढे भारताला रोखण्याचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सौरव गांगुली लिहितात...
आॅस्ट्रेलियापुढे तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताला रोखण्याचे आव्हान आहे. क्रिकेटचे स्वरूप छोटे झाले तर उभय संघांदरम्यानचा फरक काही प्रमाणात कमी होतो. पण, आॅस्ट्रेलियाला फिरकी मारा जोपर्यंत योग्यपद्धतीने खेळता येत नाही तोपर्यंत भारतीय संघ या प्रकारातही वर्चस्व गाजवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आशिष नेहराच्या पुनरागमनामुळे आनंद झाला. त्याच्यासह बुमराह भारताचा टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज आहे. डावखुरा नेहरा प्रतिस्पर्धी फलंदाजांपुढे अडचण निर्माण करण्यास सक्षम आहे. पुन्हा एकदा भारतीय फिरकीपटू आॅस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सज्ज आहेत. फिरकीपटूंविरुद्ध खेळताना फटक्यांची निवड अचूक असणे महत्त्वाचे ठरते. आॅस्ट्रेलियन खेळाडू त्यात अपयशी ठरत आहेत.

भारतावर वर्चस्व गाजवण्यासाठी आॅस्ट्रेलियाला ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रॅव्हिस हेड यांच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. मार्क्स स्टोनिसमध्ये सुधारणार झाली आहे. अन्य खेळाडू त्याच्याकडून बोध घेतील, अशी आॅस्ट्रेलियन संघव्यवस्थापनाला आशा आहे. आॅस्ट्रेलियन संघ वन-डे मालिकेतील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज पॅट कमिन्सविना खेळणार आहे. त्याला अ‍ॅशेसच्या तयारीसाठी मायदेशी परत धाडण्यात आले. आॅस्ट्रेलियाला उपखंडात खेळलेल्या गेल्या १५ पैकी १४ लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहेत. त्यामुळे स्टीव्हन स्मिथवर दडपण आले आहे. भारतीय संघ पुन्हा एकदा दावेदार म्हणून सुरुवात करणार आहे.

Web Title: Gameplan - A challenge to stop India from Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.