Felicitated world champions at the hands of Chief Minister and Governor | मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार

मुंबई : १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडक जिंकणा-या भारताच्या युवा संघाचे बुधवारी राजभवन येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्कार करण्यात आला. विजयी संघाचा कर्णधार पृथ्वी शॉसह संघातील खेळाडू ए. ठाकरे व गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांचा राजभवनात सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार उपस्थित होते. आॅस्ट्रेलियाला पराभूत करुन भारतीय युवा संघाने चौथ्यांदा विश्वकरंडक पटकाविला आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.