विराट कोहली पूर्ण करणार का पाकिस्तानी चाहत्याची 'ही' अपेक्षा ?

पाकिस्तान प्रीमिअर लीग 22 फेब्रुवारीपासून सुरु झाली असली तरी तिचे अस्तित्व जाणवताना दिसत नाही. पण एका चाहत्याच्या फलकाने मात्र या लीगला वेगळेच वलय मिळवून दिले आहे. साज सादिक, हे त्या चाहत्याचे नाव.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 10:47 AM2018-03-02T10:47:24+5:302018-03-02T10:47:24+5:30

whatsapp join usJoin us
Expecting Pakistani Kohli to fulfill Virat Kohli? | विराट कोहली पूर्ण करणार का पाकिस्तानी चाहत्याची 'ही' अपेक्षा ?

विराट कोहली पूर्ण करणार का पाकिस्तानी चाहत्याची 'ही' अपेक्षा ?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देपण जेव्हा कॅमेरा त्याच्याकडे वळला आणि त्याने फलक उंचावून दाखवला तेव्हा मात्र सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

दुबई
भारत आणि पाकिस्तान हे पारंपरीक शस्त्रू  असले तरी त्यांच्यातील सलोख्याचा मार्ग 22 यार्डातून जातो, असे म्हटले जाते. पाकिस्तानच्या खेळाडूंना नेहमीच भारतीय क्रिकेटपटूंनी भूरळ पाडलेली आहे. मग ते सुनील गावस्कर असो, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी किंवा सध्याचा कर्णधार विराट कोहली.
पाकिस्तानमध्ये सध्या सुपर लीग सुरु आहे. पण या सामन्यांना आयपीएलच्या तुलनेत फारच कमी गर्दी पाहायला मिळते. पण या किमान गर्दीतही दर्दी क्रिकेट रसिकांची उणीव नाही. हे चाहते फक्त आपल्या देशातल्या खेळाडूंवर प्रेम करतात असे नाही, तर त्यांना क्रिकेट हा खेळ जास्त आवडतो. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कटुता तिथे लोप पावते. पाकिस्तान प्रीमिअर लीग 22 फेब्रुवारीपासून सुरु झाली असली तरी तिचे अस्तित्व जाणवताना दिसत नाही. पण एका चाहत्याच्या फलकाने मात्र या लीगला वेगळेच वलय मिळवून दिले आहे. साज सादिक, हे त्या चाहत्याचे नाव.
पाकिस्तान प्रीमिअर लीगमध्ये ईस्लामाबाद युनायटेड आणि क्वेटा गॅडीएडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान सादिक एक फलक घेऊन आला होता. या फलकावर काय लिहीले आहे, याची कल्पना कुणाला नव्हती. पण जेव्हा कॅमेरा त्याच्याकडे वळला आणि त्याने फलक उंचावून दाखवला तेव्हा मात्र सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्या फलकावर लिहीले होते की, विराट आम्हाला तुला पाकिस्तान लीगमध्ये बघायचं आहे. सदिकने निरागसपणे, कोणत्याही द्वेष मनात न आणता, एक सच्चा क्रिकेटप्रेमी या नात्याने कोहलीला विनंती केली आहे. आता कोहली या पाकिस्तानच्या चाहत्याची अपेक्षा पूर्ण करणार का, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहीले आहे.

Web Title: Expecting Pakistani Kohli to fulfill Virat Kohli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.